वेश्या – भाग २

मीराला खोलीत कोंडून ती बाई निघून गेली. मीरा खोलीत एकटीच रडत बसली होती. आपण कुठे अडकलोय या विचाराने ती हादरून गेली होती. काही करू शकतो का हे पाहायला ती खिडकीकडे गेली, खिडकीला लागूनच बाहेर एक उंच अशी छान मुलगी तिला दिसली. पिवळा सलवार कमीज तिच्या रंगावर खुलून दिसत होता. केस मोकळे सोडले होते, मेक अप सगळं उतरला होता पण तिला मेक अप ची गरजच नव्हती. ओठ पाकळ्यांहूनही नाजूक अन त्यात उजव्या बाजूला गाल आणि ओठ जुळतात तिथे एक दर्शनीय तीळ. डोळे भलतेच मादक! तिला पाहून मीराला वाटलं की आपण एखाद्या सिनेमातली नटीच पाहतोय. गॅल्लरीच्या कठड्याला ती टेकून थांबली होती. दाराला कुलूप पाहिलं बाहेरून आणि तिची नजर खिडकीतून तिच्याकडे पाहत असलेल्या मीरावर गेली. तिने एक तिरपा कटाक्ष टाकला मीरावर आणि कुलूपाकडे पाहिलं. एकूण तिला काय ते सगळं कळलं. तिने बाजूच्याच खोलीच्या दरवाजावर थाप मारली अन ओरडली शांताक्का, चाबी दो – मै हूँ – नूर! मीराला तीचं नाव कळलं. बोलता बोलताच तिने जवळ असलेल्या पर्से मधून एक सिगारेट च पाकीट काढलं अन एक सिगारेट शिलगावली. पहिला कष घेऊन गॅलरीच्या बाहेर सोडला हवेत आणि मीराकडे वळून म्हणाली, मै दरवाजा खोलेगी तो तू भागेगी नाही ना? भाग भी नाही सकती.. शांताक्का के आदमी तेरेको जहन्नुम से भी खोज लेंगे. तिच्या बोलण्याची एक वेगळीच लकब होती. एक पाय कठड्यावर ठेऊन तिने निवांत पुढचा कष मारला आणि यावेळी मात्र धूर तिने खिडकीत मीराच्या चेहऱ्यावर सोडला. मीराला चीड आली त्याची, पण ती काहीच करू शकत नव्हती. तिची सिगारेट संपत आली तरी अजून शांताक्काने चावी आणली नव्हती. ये शांताक्का भी ना, घोडे बेच के सोती है, असा म्हणून दरवाज्यावर थाप मारणार तेवढ्यात दरवाजा उघडला शांताक्काने आणि चावी दिली. मरगळलेल्या आवाजातच शांताक्का म्हणाली, छोकरी पे ध्यान रख – नयी है! एवढं म्हणून तिने दरवाजा लावून घेतला. सिगारेट चा शेवटचा कष मारून नूरने दरवाजा उघडला. मीरा एका कोपऱ्यात दबकून उभी होती. नूर आत आली आणि दरवाजा लावून घेतला आतून. मीराकडे पाहिलं..रघ्या ने बताया मेरेको तेरे बारे मे… मीराच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.. रघ्या कोण? नूर बोलत होती- रच्या दुनिया के लिये रिक्षा चलाता है, असल मे हम जैसे लडकियों की दलाली करता है…भाडखाऊ: मीराला हे सगळं नवीन होत.. पण मी त्याला कुठं भेटले? मीराचा अगतिक प्रश्न

सुबह 3:30 बजे फोन किया उसने मेरेको, पूछ रहा था, हायवे की बाजू मे थोडी झाडीयो मे एक लडकी बेहोष पडी है, लेके आऊ क्या? मैने बोला मुझे इस लफडे मे नही पडना, फिर उसने अक्का को फोन किया.. और तेरेको यहा लाया. है कौन तू? किसी बडे बाप की बेटी तो नही है ना? फोकट मे लेने के देने पड जायेंगे. बोलत बोलत नूर ने कोपऱ्यात असलेल्या छोट्या कपाटातून एक सिल्कवाला गाऊन काढला आणि खिडकीच्या बाजूला असलेल्या बाथरूम कडे तोंड करून कपडे बदलले आणि बेडवर येऊन बसली. मीराला इशारा केला बसायला, मीरा दबकून वागत होती- अशोक कुठाय? तिने घाबरतच विचारलं- कोण अशोक? तेरेको बोला ना… वो झाडीयो मे तू अकेली बेहोष पडी थी.. उसीका फायदा उठाया चमडी रघ्या ने. पी हुई थी क्या? मीराचा गोंधळ अजून वाढत होता, ज्या अर्थी रघ्या ने तिला पुण्याजवळच्या रोडवरून इथे आणलं त्या अर्थी ती एकटीच पुण्याला आली होती आणि तिला इथे आणायला अशोक कारणीभूत नव्हता हे पक्क झालं. पण अजूनही प्रश्न तोच होता, अशोक गेला कुठे? नेमक काय झालं होत काल रात्री? या विचारात असतानाच नूर चा फोन वाजला, वो ही है चमडी असा म्हणत तिने फोन उचलला- ऐसी फूल सी लडकी को यहा लाने मे शरम नही आयी तेरेको.. भाडखाऊ…. 15000- साला, पैंसों के लिये अपनी मा बहेन भी बेच देगा तू एक दिन भेन्चोदः हा चल पता है कितना कमीना है तू, चल फोन रख.. सोने जारी मै अभी.. शाम को फोन करती मै तेरेको…

मीराचं डोकं गरगरत होत. तिच्या आयुष्याची किंमत या बाजारात 15000 लागली होती. तिला त्याच कारणही कळत नव्हतं आणि आशेचा फक्त एकच किरण दिसत होता तो म्हणजे – अशोक! त्याचाही मागमूस नव्हता. मीरा तशीच भिंतीला टेकून दोन्ही गुढघ्यात डोकं ठेऊन हताश होऊन बसली…..

मीरा दोन्ही गुढघ्यात डोकं ठेऊन हताश होऊन बसली होती. नूर ला झोप लागली होती. खोलीभर शांतता! त्या शांततेत मीराचा बसल्या बसल्याच डोळा लागला. तास दीड तासाने दरवाजाच्या ठकठकीने मीराला जाग आली. शांताक्का! सकाळचं तीच रौद्र रूप एकदम पालटलं होत. गुलाबी रंगाची फिक्कट साडी तिच्या सुरकुत्यांवर शोभणारी होती. साडीमुळं तीच वय बरंच झाकलं जात होत. हातात एक प्लेट होती. अशा पोह्याचा वास मीराला गावाकडे वेशीवरच्या टपरीवर आला होता. शांताक्का आत आली. घोडी अजून झोपलीए- नूर कडे पाहत म्हणाली. उठ, तोंड धु आणि खाऊन घे. रडून रडून डोळे सुजलेत बघ किती…उठ.. लागलं का मघाशी…शांताक्काच हे रूप मीराला समजत नव्हतं. हीच का ती सकाळची बाई जिने मला एवढ्या रागाने ढकललं? ती नाईलाजाने उठली, टेबलावरच्या जगातून तोंडावर पाणी मारलं आणि पुन्हा त्याच जागेवर बसली. शांताक्का बेडवर नूरच्या पायाशी बसली. नूर अधून मधून घोरत होती, तिला गाढ झोप लागली होती. शांताक्का ने पोह्याची प्लेट मीराकडे दिली अन विचारलं, काय करत होती एवढ्या रात्रीची त्या झाडीत? अन बेशुद्ध कशी पडली तू? या प्रश्नांची उत्तर स्वतः मीरा देखील शोधत होती, तिने दारुड्या बापापासून ते अशोकच्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपेपर्यंत सगळं सांगितलं. पण त्यानंतरच तिला काही आठवतच नव्हतं. नूरच्या म्हणण्याप्रमाणे रघ्याला ती पुण्यात सापडली. तू ज्याच्या सोबत आली होतीस त्यानीच टाकलं असेल तुला! माणसाची जात ती! शांताक्का तिरसटपणे म्हणाली. नाही पण अशोक चा यात हात असल्याची काहीच चिन्हे नव्हती. मीरा ने खाणं थांबवलं, शांताक्का कडे एक आसुसलेला कटाक्ष टाकून म्हणाली, मला सोडा ओ इथून, जाऊ द्या मला घरी! तिच्या बोलण्यात हुंदके अजूनही येत होते. शांताक्का – हे बघ असाही तुझ्या घरी स्वतःच असा कुणी राहील नाहीये. बापाला तर तू आधीच दुरावलं आणि ज्याच्यासाठी तू बापाला सोडलं तो तुला रस्त्यावर टाकून पळून गेला, तिकडे राहिलाय तरी कोण तुझं? आणि असाही आधार नसताना बाहेरच्या जगात गेली तर तुझ्या शरीराचे लचके तोडायला वळणावळणावर बसलेत कुत्रे जाशील कुठे? इकडं फक्त येण्याचाच रस्तामाघारी जायचा रस्ता नाही. आणि धंद्याचं बोलायचं तर 15000 रुपये मोजलेत तुझ्यासाठी. हो, माझे 15000 रुपये सुटले की खुशाल जा! नियम आहे इथला, इथं आलेली पोरगी पहिली दोन वर्षे फक्त माझ्यासाठी धंदा करते. तुझी सगळी कमाई । माझी. दोन वर्षांनी तीच तिने पाहायचं, परत जायचं बाहेरच्या जगात की राहायचं इथेच…आणि दोन वर्षांनी इथून परत जायची कुणाची हिम्मतही नसते आणि समाज कसा स्वीकारेल इथे दोन वर्षे राहिलेल्या बाईला. इथे राहिलेली बाई- बाई राहत नाही, ते वेश्या होते, रांड होते – बाहेरच्या जगात तुला मान नाही, तिथे फक्त तुझी गरज आहे त्यांची भूक भागवण्यासाठी.. सरळसोट हिशोब आहे, सगळेच धंदा करतात. ज्याच्याकडे जे चांगलं असेल तो ते विकतो- आपण आपल शरीर विकतो. जगासाठी असेल वाईट पण आपल पोट यांच्यावरच भरतो आणि आपल्याला नाव ठेवणार जग पण रात्रीच्या अंधारात आपल्याच बिछान्यावर येऊन नीजत आणि सकाळच्या उजेडात सभ्यपणाचा आव आणून निर्लज्जपणे वावरत. तुला त्यांची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांना तुझी गरज आहे. आपण नसतो तर बलात्कार झाले असते दिवसाढवळ्या.. आत्ता पण होतात पण आपल्यामुळे त्यांना जागा मिळते त्यांच्या आतल्या जनावराला मोकळं रान द्यायचा. एवढा सरळ आहे आपला – धंदा!

दोन वर्ष तरी इथून तुझी सुटका नाही. तू मला आधार दे, मी तुला आधार देते हा आपल्यात होणारा धंदा! दोन वर्षांनी तुझी कमाई तुझी. पण तोपर्यंत तुझ्यावर हक्क फक्त माझा!

भयानक होत हे सगळं मीरासाठी. परत जायचा मार्ग सापडत नव्हता आणि कारणही. शांताक्काने तिचं चांगलाच ब्रेनवॉश केलं होत. तिची वेश्यांकडे पाहायची नजर बदलली होती पण अजूनही या प्रकाराची किळस वाटत होती. त्यांच्यात स्वतःला पाहायला मन धजावत नव्हतं तिचं पण तिला दुसरा पर्याय नव्हता. ती आता पुरती फसली होती.

नूर इकडच्या कुशीतून तिकडे अशी लोळत होती. झोपेतच म्हणाली – अये अक्का सोने दे ना, क्यों ग्यान दे री? समझा देगी मै सब इसको. समजदार है छोकरी… आळसावलेल्या स्वरात, अर्धवट झोपेत ती बोलली आणि परत झोपली.

अक्काने अर्धवट राहिलेली पोह्याची प्लेट उचलली अन जाऊ लागली. मीरा तिच्याकडे आशेने पाहत होती. अक्का म्हणाली, झोपून जा.. असाही आपला दिवस रात्री चालू होतो. हे म्हणून दरवाजा लावून निघून गेली.

मीराला अशोकचा कवडसाही पुसट होताना दिसत होता. पुढचा काहीच मार्ग दिसत नव्हता. पण अजूनही एक प्रश्न तिला स्वस्थ बसू देत नव्हता, अशोक गेला कुठे? त्याच काय झालं? या विचारातच ती जमिनीवरच लवंडली. तिला कधी झोप लागली तिचं तिलाच कळलं नाही.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments