आध्यत्मिक चारोळ्या

1) मनी नसावा अहंकार ।
विवेकी जाणावा श्रीराम ।।
असता मुखी त्याचे नाम ।
सहज होते सर्व काम ।।

2) जैसे बीजात असे अंकुर ।
तैसे हृदयी ठेवावा श्रीराम ।।
वृत्ती सात्विक हा परिणाम ।
सहज होते सर्व काम ।।

3) वारी गोंदवल्याची करित ।
तहानभूक हरते चित्त ।।
नाही द्यावे लागत दाम ।
मुखी घ्या रामनाम ।।
सहज होते सर्व काम ।

4) कर्तेपणा न धरावा मनी ।
रामकर्ता भाव जाणावा ध्यानी ।।
नम्र होऊनी घ्यावे राम नाम ।
सहज होते सर्व काम ।।

5) रामचरित्र अनुकरणीय ।
श्रीकृष्ण चरित्र चिंतनीय ।।
घेता मुखी रामकृष्ण नाम ।
सहज होते सर्व काम ।।

6) नका धरू प्रपंचाची आस ।
घ्यावा रामनामाचा ध्यास ।।
चित्तात असावे सदैव रामनाम ।।
सहज होते सर्व काम ।

7) निश्चये सांगती श्री महाराज ।
टाकावा माझ्यावरती सर्व भार ।।
मनी धरू नका संशय ।।
सहज होते सर्व काम ।

-: कमलाकर पुंड

 

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments