तीन दिवसीय अभ्यास दौरा – प्रेरक अनुभव

*तीन दिवसीय अभ्यास दौरा – प्रेरक अनुभव*

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण ठिकाण पाहण्यासाठी अभ्यास करण्यासाठी शासनाच्या वतीने अविष्कार भारत योजनेअंतर्गत रचना करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील 65 विद्यार्थी व सोबत त्यांच्यासाठी कष्ट करणारी शिक्षक कर्नाटक राज्यातील बेंगलोर या ठिकाणी अभ्यास दौरा जाणार आहे अशी माहिती मिळाली. तसेच यासाठी माझी ही निवड झाली ही आनंदाची बातमी माझ्या घरातील आई-बाबा यांना दिली आनंदाने आम्ही प्रवासाची तयारी करत होतो आणि तो दिवस आला.

27 फेब्रुवारी 2025 रोजी आम्ही खामसवाडी गावातून प्रवासाला सुरुवात केली. माझ्यासोबत गावातील आठ विद्यार्थी व आमच्या शिक्षिका गीतांजलीताई लोभे यांची पण निवड झाली होती. जिल्हा ठिकाणी आम्ही पोहोचलो. प्रवासाला निघण्यापूर्वी अभ्यास सहलीतील जिल्ह्यातील सर्व मुलां मुलींची ओळख झाली. सर्वांना एकसारखे कपडे व टोपी , ओळखपत्र , गटरचना करून तयार आमच्या झाली.

जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी मा. अशोकराव पाटील सर व जिल्हा परिषद धाराशिव चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रवासासाठी शुभेच्छा घेऊन आम्ही सोलापूर कडे प्रस्थान केले.. धाराशिव ते सोलापूर ट्रॅव्हल्स ने प्रवास करून सोलापूर रेल्वे स्थानकावर दुपारी तीन वाजता पोहोचलो. माझ्यासाठी रेल्वे प्रवास हा पहिलाच त्यामुळे मनामध्ये थोडी भीती आणि पुढील प्रवासाची उत्सुकता अधिक होती.

सोलापूर रेल्वे स्थानकावरून चार-पाच 50 च्या रेल्वेने आम्ही बेंगलोरकडील प्रवासाला सुरुवात केली पहिल्या प्रवासा बेंगलोर शहर पाहण्यासाठी निघालो त्यामुळे मनात खूप उत्साह होता दुसऱ्या दिवशी सकाळी आठ पंचेचाळीस ला बेंगलोरच्या भव्य अशा रेल्वेस्थानकावरती पोहोचलो मनामध्ये खूप आनंद होत होता. रेल्वे स्थानकावरून जवळच असलेल्या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. आम्ही सर्वजण आवरून लवकरच नाश्त्यासाठी एकत्र जमलो.

नाष्ट्यानंतर पहिल्या दिवसाची सुरुवात झाली आम्ही सर्वजण स्थानिक ट्रॅव्हल्स ने विश्वेश्वरय्या औद्योगिक व टेक्नॉलॉजीकल शासकीय संग्रहालय गेलो. या ठिकाणी प्रवेश केला . सुरुवातीला वेगवेगळे प्राणी यंत्रे पाहिली यंत्रामध्ये साधी यंत्रे गुंतागुंतीची यंत्रे असे वेगवेगळे साधनसामुग्री पाहत पाहत पुढे गेल्यावर आम्हाला या ठिकाणी विमान व त्याचे विविध पार्ट पाहिला मिळाले याचा आम्ही सर्वांनी बारकाईने पाहणी करून प्रश्न उत्तर केले. तसेच या ठिकाणी राईट बंधूंनी पहिल्यांदा उडवलेल्या विमानाची प्रतिकृती होती या विमानात व आत्ताच्या आधुनिक विमानात खूप बदल होत गेला आहे. तसेच या ठिकाणी तांत्रिक व तंत्रज्ञानाचे वेगवेगळे विभाग आहेत.

यानंतर आम्ही सर्वजण कर्नाटका हायकोर्ट बघण्यासाठी गेलो त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हा सर्वांना प्रवेश दारातूनच परत यावे लागले. मात्र या भव्य वास्तुसमोर आम्ही सर्वांनी एक सामूहिक फोटो घेतला. हे पहात असताना माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. भविष्यात जर मी न्यायाधीश झाले तर माझ्याकडून अन्यायग्रस्तांसाठी न्याय देण्याचे कार्य करेन. व माझ्या गावाचे व आई बाबाचे नाव मोठे करेन असे अनेक प्रश्न मनामध्ये येऊन गेले.

कर्नाटक राज्याची विधानसभा पाहण्यासाठी पोचलो. विधानसभेच्या भव्य आणि दिव्य इमारतीने माझे डोळे दिपले इमारत सहा सात मजली उंच होती. विधान सभेच्या सभागृहात प्रवेश केला समोरच्या रांगेत उभारल्यानंतर समोरच विधानसभा अध्यक्ष(सभापती ) यांची खुर्ची होती. त्यांच्यासमोर विधानसभेतील सर्व सदस्यांसाठी अर्धवर्तुळाकार स्थापित केलेल्या खुर्च्यांची मांडणी केलेली होती. माझ्या मनामध्ये पुन्हा प्रश्न निर्माण झाले याच सभागृहांमध्ये कर्नाटक राज्याच्या हिताचे अनेक निर्णय होत असते. खरंच आत्ताचे राजकीय नेते सर्वसामान्यांसाठी काही प्रश्न विचारत असतील का? माझ्याही राज्याचे असेच भव्य दिव्य विधानसभा असेल का? अशा अनेक प्रश्न घेऊन विधानसभा पहात पहात बाहेर पडलो. वि विधानसभेच्या जवळच असलेली लालबाग पाहण्यासाठी जायचे होते. वाटेत जेवण केलं . जेवण करून झाल्यावर लालबाग पाहण्यासाठी प्रवेशद्वारातून प्रवेश करताच वेगवेगळ्या फुलांची तसेच शोची अनेक झाडे पाहताना आनंद घेतला. या बागेमध्ये मला आवडलेलं म्हणजे वेगवेगळ्या लाकडावर कोरीव काम करून अनेक शिल्पे बनवले आहेत ती पाहत असताना मनामध्ये एक वेगळी ऊर्जा मिळून गेली. याच ठिकाणी एक सुंदर glass House सुध्दा पाहता आले. अशा वेगवेगळ्या ठिकाणी पाहत पाहत पहिला दिवस कधी संपला हे समजेल नाही. रात्री आमच्या नियोजित ठिकाणी विश्रांतीसाठी आलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरून पुढील सुचनेकडे वाट पाहत होतो. तेवढ्यात नाष्टा करण्यासाठी बोलावले. नाष्टा करून पुढील प्रवासासाठी निघालो.

आजचे पहिले ठिकाण होते , जवाहरलाल नेहरू तारांगण पहाण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी तारांगणव सायन्स पार्क होते. यामध्ये विविध वैज्ञानिक खेळणी होते. ते पाहून तारांगण येथील 3D शो पाहिला. हे पाहत असताना आम्ही कधी अवकाशात जाऊन बसले हे समजले नाही. आम्ही अवकाशातून तारे , ग्रह पाहून अवकाशातून पृथ्वीवर आलो. असेच चंद्रयान ३ कसे बनले व कसे उड्डाण केले, किती संशोधकांनी मेहनत घेतली. याबद्दलची माहिती घेऊन पुढील प्रवासासाठी निघालो.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे, ज्याचे मुख्यालय बेंगळुरू (बंगळुरू) येथे आहे. २३ डिसेंबर १९४० रोजी स्थापित, HAL ही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी एरोस्पेस आणि संरक्षण उत्पादक कंपनी आहे. या ठिकाणी १९४२ मध्ये भारतीय हवाई दलासाठी हार्लो PC-5, कर्टिस P-36 हॉक आणि व्हल्टी A-31 व्हेंजन्सच्या परवानाकृत उत्पादनासह विमान निर्मिती सुरू केली. या ठिकाणी आम्ही जाऊन विमान निर्मिती कशी केले जाते. हे पाहिल्यावर आम्ही अभिमानाने फिरत होतो. कारण या कंपनीची सुरूवात महाराष्ट्रातील शेट वालचंद हिराचंद हे निर्मिती मध्ये सहभागी उद्योजक होते. २०३० सांगली तयार होणारे आधुनिक लढाऊ विमानांची माहिती घेऊन उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा घेऊन बाहेर पडलो.

आजचा शेवटचे ठिकाण कडे निघालो, लुलू मॉल ची इमारत ही पुर्ण पुणे काचेची होती. एकाच ठिकाणी विविध प्रकारची दुकाने व खेळण्यासाठी साहित्य होते. असे वेगळे पाहून दुसऱ्या दिवसाची शेवट झाला.

तिस- या दिवशी बंगलोर पासून जवळच असलेल्या म्हैसूर येथील टिपू सुलतान चा राजवाडा म्हणजे पॅलेस पाहण्यासाठी गेलो. त्या ठिकाणी च्या गाईड ने संपुर्ण इतिहास सांगत माहिती दिली. हा राजवाडा संपूर्ण लाकडाचा आहे. त्यामुळे आधुनिक बांधकाम यातील फरक लक्षात आले . तसेच हे बांधकाम करताना वापरलेली लाकडे ही कावेरी नदीच्या पात्रात १ वर्ष ठेवून त्यातील उत्तम लाकूड वापरला . अशा बांधकामातून थंडावा तसाच आहे. लाकडावरील कोरीव काम तसेच दरवाजा वरील नक्षीकाम हे अत्यंत नाजूक व विलक्षण होते. सुरेख कोरलेली दरवाजे सुबक दिसत होती. यानंतर ओरिजनल मॉल संपूर्ण पाहून आम्ही बंगलोर प्रवासाचा शेवट केला.

सायंकाळी ७:१५च्या रेल्वेने सोलापूर कडे निघालो. आम्ही ६५ विद्यार्थी आणि ज्यांच्यामुळे हा प्रवास सुखदायी झाले ते आमचे सोबत आलेले शिक्षक श्री योगिराज भोसले सर . , श्री. जमाले सर , उंबरे सर , शिक्षिका गीतांजलीताई लोभे, करिश्माताई शेख, उमाताई कोरे हे सर्वजण होते.

माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कोकाटे सर , वाघमारे सर यांनी या प्रवासाला जाण्यासाठी मदत केल्या मुळेच मला सहभागी होता आले.

अभ्यास दौरातील व माझ्या शाळेतील शिक्षकांचे मनःपूर्वक आभार. या प्रवासामुळे मला वैज्ञानिक, सामाजिक, शैक्षणिक, व्यवसायिक दृष्टीकोन समृद्ध होण्यासाठी मदत झाली.

 

कु. श्रावणी राजकुमार शेळके.

जिल्हा परिषद प्रशाला , खामसवाडी

ता. कळंब जि. धाराशिव

कु. श्रावणी राजकुमार शेळके

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments