१० सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित
(तरुणांमधील वाढत जाणार्या आत्महत्येवर मानशास्त्रीय विश्लेषण)
उगवत्या सूर्याला ग्रहण का लागले ?
अनेक महापुरुषांनी तत्त्ववेत्यांनी विचारवंतांनी अनेक धार्मिक ग्रंथात तरुणाबद्दल युवकांबद्दल मोठमोठी विधाने केलीत आणि ती खरी पण आहेत, कारण प्रत्येक जणांनी तरुण पण जगलेली असतं नवी उमेद, नवचैतन्य ,नवउत्साह ,नवक्रांती ,उगवत्या सूर्याचे जसे रूप तेजोमय दिसते हवेहवेसे वाटते त्या सूर्याची उपमा तरुण युवाला दिलेली आहे, तलवारीची तळपती धार म्हणजे तरुण, जंगलातील वाघ म्हणजे तरुण, चपळ हरणाची धाव म्हणजे तरुण, गरुडाची झेप म्हणजे तरुण, सागराची उंच लाट म्हणजे तरुण,महाभारतातील युद्धाची ललकार म्हणजे तरुण ,इतक्या साऱ्या उपमा तरुणांना का दिल्या असतील? याचा विचार कधीतरी तरुण वर्गांनी नैराश्यातून आत्महत्येचे पाऊल उचलताना करावा एक विचारवंत सांगून गेला ज्या देशाकडे तरुण जास्त तो देश सर्वात शक्तिशाली असतो पुढे लिहीताना तो सांगतो अशा देशाला युद्धात असो अथवा कार्यात खेळात असो अथवा संशोधनात हरवणे अशक्य असते पण जर का या देशाला हरवायचे असेल तर तरुणांना व्यसनाची सवय लावा.यामुळे ते प्रगतीकडे जाण्याऐवजी अधोगती कडे जातील, हीच परिस्थिती हळूहळू आपल्या देशात निर्माण होताना दिसते कालचा एक अहवाल वाचण्यात आला यामध्ये तरुणांचे आत्महत्येचे प्रमाण देशाच्या इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक आहे ते चिंताजनक आहे महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भ या भागात शेतकरी आत्महत्याचे प्रमाण ज्याप्रमाणे जास्त होते त्यामध्ये सुद्धा तरुण शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त असायचे तर आज घडीला विद्यार्थी व सुशिक्षित तरुणांचे प्रमाण सुद्धा वाढताना दिसते वाढती बेरोजगारी, आई वडिलांचे अवास्तव अपेक्षा ,जीवघेणी स्पर्धा, नकारात्मक विचार श्रेणी, नवीन काही करण्यापेक्षा एका क्षेत्राकडे ओढ यामुळे येणारे अपयश ,कामाचे अभ्यासाचे नियोजन नसणे ,आपल्याला नेमके काय करायचे हेच माहीत नसणे, यामुळे द्विधा मनस्थिती चुकीचे मार्गदर्शन, सोशल मीडियाचा अतिवापर, वास्तविक जगापेक्षा काल्पनिक जगाची आवड ,सामाजिक, आर्थिक अडचणी यातून होणारी मानसिकतेत बदल या सर्व गोष्टीतून वाढत जाणारा ताण व त्यातून येणारे नैराश्य यामुळे जीवन नकोसे वाटणे ,झोप न लागणे, कशातही मन न लागणे ,एक एकटे वाटणे कुठलेही कार्य आपण करू शकत नाही ही भावना होणे, नशिबाला दोष देत बसणे, चिडचिडपणा वाढणे, राग येणे नेहमी थकल्यासारखे वाटणे, या जगात आपले कोणीच नाही ही भावना तयार होणे नकारात्मक विचार वाढणे वजन घटणे, व्यसनाच्या सवयी लागणे ,आत्महत्येचे विचार येणे, वरील सर्व लक्षणे नैराश्यतून निर्माण होतात परिणामी अनेक तरुण चुकीचे पाऊल उचलतात व जीवन संपवतात अशा काही केस रुग्णालयापर्यंत येतात व समुपदेशनातून औषध उपचारातून आपले जीवन सुधारतात परंतु अनेक तरुण त्यात अडकून बसतात कुठे जायचे? काय करायचे? यातून आपण बाहेर पडू शकणार नाही? या भावनेतून चुकीचे निर्णय घेतात.
आपण काही केसेस मधून समजून घेऊया
(सदरील केसेसचा वापर आपण मानसिक जनजागृतीसाठी करत आहोत यामध्ये काही गोष्टी काल्पनिक असतील नाव गाव सर्व बदल करण्यात आला असून कुणाचा काही संबंध आल्यास योगायोग समजावा).
केस न 1-
आज जरी अथर्व चांगले जीवन जगत असला अकॅडमी मध्ये चांगला परफॉर्मन्स करत असला तरीसुद्धा अथर्व दोन वर्षांपूर्वी मृत्यूच्या दारातून परत आला होता अथर्व पुण्याच्या नामांकित कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिकणारा आई-वडील दोघेपण चांगल्या नौकरीला त्यांचा तो एकुलता एक मुलगा हॉस्टेलमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने मित्रांनी लगेच खाजगी रुग्णालयात ऍडमिट केले व कसातरी वाचला डॉक्टरांनी ट्रीटमेंट दिल्यानंतर मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेण्याचे सुचवले आई-वडील सुशिक्षित असून सुद्धा आमचा मुलगा वेडा आहे का म्हणून पुण्यात न दाखवता त्यांच्याकडे म्हणजे नांदेड येथे घेऊन आले काही दिवसानंतर वडिलांच्या मित्राच्या सांगण्यावरून जिल्हा रुग्णालय नांदेड आमच्या विभागात आले सुरुवातीला वडील सांगत होते काही नाही मुलाला झोप येत नाही, चिडचिड करतो परत केस हिस्ट्री घेताना वडील जास्त काय सांगत नव्हते परंतु आईने रडत रड सांगायला सुरुवात केली अथर्व आमचा एकटाच मुलगा आहे त्यांने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला पुण्यात ऍडमिट होता त्याला आम्ही आमच्याकडे घेऊन आलो परंतु जास्त बोलत नाही एक एकटा राहतो काय करावे कळेना आमचा मुलगा आम्हाला गमवायचा नाही त्याच्यासाठी काही करायला तयार आहोत अथर्व बाहेर बसला होता त्याला आत मध्ये बोलावले आई-वडिलांना बाहेर थांबायला सांगितले सुरुवातीला अथर्व आमच्याशी पण काही बोलत नव्हता नंतर हळूहळू सांगायला सुरुवात केली मला दहावी मध्ये ८८% व बारावी मध्ये ९०% मार्क्स आहे परंतु सीईटीला कमी मार्क्स आले मला खरं तर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग करायचीच नव्हती पण पप्पा व आईच्या सांगण्यावरून त्यांनी खूप फोर्स केला व पुण्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये फीस भरून ऍडमिशन केली मी तर म्हणलो नाही माझ्यावर इतका खर्च करा नेहमी फोन आला की बोलायची खूप खर्च करत आहोत अभ्यास कर अभ्यास कर ..मित्रांसोबत बाहेर जाऊ नको ..हे करू नको ते करू नको फक्त अभ्यास आणि अभ्यास मी खूप थकलो होतो असे जीवन नकोय मला आई-वडिलांचा फोन जरी आला तर राग यायचा मी शाळेत होतो तेव्हापासून आई पप्पा कडे माझ्यासाठी वेळ नसायचा मी शाळेतून आल्यानंतर एकटाच असायचा आई पप्पा ऑफिस वरून आली की ऑफिसचा राग एकमेकांवर काढायची व नंतर मला रागवायची अभ्यास कर मला कधी वेळ दिला नाही मला कशात करिअर करायची कधी विचारले नाही मला एक्टिंग मध्ये गाण्यांमध्ये आवड होती पण आई पप्पा म्हणायचे तो फक्त एक छंद असतो त्यामध्ये करिअर नसते त्यांनी का तू खूप मोठा अभिनेता होणार का? अभ्यासाकडे लक्ष दे मी दहावी बारावी पूर्ण केली पण नंतर मन लागत नव्हते तरी पण पप्पांनी पुण्याला ऍडमिशन घेतलं मी यासाठी तयार झालो कारण मला त्यांच्यापासून मोकळा श्वास घेता येईल कॉलेजला आल्यानंतर होस्टेलला काही मित्र झाली खूप चांगली वाटायची पण आई पप्पा सारखी अभ्यासाबद्दल बोलायची कॉलेजमध्ये मी गॅदरिंग मध्ये भाग घेतला माझ्यातील कलाकार मला शांत बसू देत नव्हता मला पहिल्यांदा स्टेजवर अभिनय करायला डान्स गाणी म्हणायला भेटली खूप छान वाटले माझ्या मित्रांनी माझी खूप तारीफ केली खूप मस्त वाटलं मी माझे व्हिडिओ आई पप्पांना पाठवले त्यांनी फोन करून छान छान आहेत असे म्हटले खूप छान वाटले माझे मित्र म्हणत होती तू अभिनेत्री निवडायला पाहिजे होती मी यावेळेस ठरवलं आई पप्पा आले की याबद्दल बोलायचे एखाद्या अकॅडमी जॉईन करायची काही दिवसांनी आई पप्पा पुण्याला भेटायला कॉलेजला आली माझ्या मित्रांना पण कॅन्टीनला बोलावले छान बोलली नंतर हळूच माझ्या मित्रांनी एक्टिंग बद्दल बोलले तर पप्पा थोडी चिडले झाली नाही ग्यादरिंग त्यातून बाहेर निघा आणि अभ्यासाला लागा मी अकॅडमी जॉईन करायची म्हटली की परत सर्व मित्रांसमोर रागावली आई सुद्धा बोलली मित्रांना पण रागावली या गोष्टींनी पोट भरत नसते चांगला अभ्यास करा चांगला इंजिनियर बना मूर्खासारखी करू नका माझे मित्र हळूहळू तिथून निघून गेली नंतर पण आई पप्पा सारखी लेक्चर देत राहिली खूप वाईट वाटलं नंतर मी आठ दहा दिवस फक्त हॉस्टेलला होतो कॉलेजला गेलोच नाही पप्पा बोलल्यामुळे मित्र पण रूमवर जास्त येत नव्हती पण काही मित्र म्हणायचे आई-वडील बोलत असतात जास्त टेन्शन घ्यायचं नाही नाही पण मला खूप वाईट वाटलं कशाच म्हण लागत नव्हतं हळूहळू रात्री झोपून लागायची नाही जीवन नकोशी वाटू लागली रडू यायचं एके दिवशी पप्पाचा फोन आला तू कॉलेजला का जात नाहीस आम्हाला कॉल आला होता यासाठी इतका खर्च केला का खूप रागावली पप्पा खूप काही बोलली मला वाटलं काहीतरी समजून घेईन पण नाही आई पण रागावली खूप वाईट वाटले खूप रडलो आणि शेवटी ठरवली हे जीवन नकोय होस्टेलच्या बाथरूम मध्ये फिनाल होती ती रूम मध्ये आणली व ती घेतली पण थोड्याच वेळा मित्र आला माझी अवस्था बघून थोडा घाबरला लगेच इतर मित्रांच्या मदतीने जवळच जवळच असलेल्या हॉस्पिटल ला ऍडमिट केले नंतर हॉस्टेल वरून आई बापाला कोणीतरी सांगितले व ती तिथे आली व मला इकडे घेऊन आली अथर्वला दहा दिवसाची मेडिसिन मेडिसिन व समुपदेशन करण्यात आले त्यानंतर अथर्व त्याचे आई-वडील नियमित समुपदेशनासाठी व औषध उपचार उपचारासाठी यायचे अथर्वला यातून बाहेर निघण्यासाठी सहा महिने लागली पण आज त्याची परिस्थिती खूप बदलली आई-वडिलांनी समजून घेतली त्यांची समुपदेशन करण्यात आली करियर मुलांचे त्याच्या आवडीनुसार निवडा त्याला समजून घ्या योग्य मार्गदर्शन घ्या त्याच्या आई वडील बना शिक्षक होण्याचा प्रयत्न करू नका कधी कधी बऱ्याच केस मध्ये आई वडील सुद्धा जबाबदार असतात त्यामुळे सुद्धा अशी परिस्थिती येऊ शकते अथर्वला आईवडिलांनी पहिले जर समजून घेतले असते त्याचे आवडीनिवडी जाणून घेतले असतात कशामध्ये करिअर करायची जर विचारले असते तर पुढची परिस्थिती घडली नसती मुलांना वेळ देणं खूप महत्त्वाचे आहे त्यांच्याशी नेहमी बोला त्यांच्या समस्या ओळखून घ्या
केस-2
ICU बाहेर एक काकू खूप रडताना दिसल्या स्वतःला शिव्या देत हाताने डोक्याला मारून रडत होते आजूबाजूचे सर्व प्रश्नार्थक नजरेने बघत होती नंतर आम्ही ICU मध्ये गेल्यानंतर कळाले सोळा वर्षाच्या स्मिताने हाताने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता ती आयुष्यामध्ये ऍडमिट होती बाहेर रडणारी तिची आई होती. स्मिता ची तब्येत आता ठीक होती पण आई खूप घाबरून गेली होती आता स्मिता शी बोलणे योग्य नसल्यामुळे तिला आज आठ दिवसाची मेडिसिन देण्यात आले आईला एकटि ला बोलवण्यात आले रडू नका आता तुमची मुलगी ठीक आहे तिला शांत झोप येईल मानसोपचार तज्ञांनी सुद्धा असाच मेडिसिन दिले व आपण तिचे समुपदेशन उद्या करू आम्ही तिच्या आईकडून हिस्टरी घेण्याचा प्रयत्न केला आई सांगत होती माझे मिस्टर ही चार वर्षाची असतानाच अपघातात गेली तेव्हापासून मी इतर घरी धुणे भांडी घासून स्मिताला लहानाचे मोठे केलं सर्व हट्ट पुरवले बापाची कमतरता कधीच भासू दिली नाही कारण हेच माझे जग आहे सर्वस्व आहे दुसरं कोणीही नाही खूप जिद्दी आहे एखादी गोष्ट सांगितली की ती द्यावी लागते कारण लहानपणापासून मी तिला नाही काही म्हटले नाही पण मागील वीस दिवसापासून आयफोन चा फोन घ्यायचा म्हणून म्हणायची मी तिला मागच्या वर्षी पाच हजार रुपयांचा फोन घेऊन दिला पण आता म्हणत होती मला पन्नास हजार रुपये दे साहेब मी कुठून आणू इतके पैसे म्हणून मी नाही म्हटलं तर तिने हाताची नस कापून घेतली मी मुलीची इतके रक्त बघून खूप घाबरले शेजारी लोकांनी तिला जिल्हा रुग्णालयात इथे ऍडमिट केलं आता थोडी ठीक आहे पण मला भीती वाटते साहेब आईला मी समजावून ठीक होईल सर्व तुम्ही शांत रहा तिला धीर देण्यात आला दुसऱ्या दिवशी स्मिता छान बोलत होती पण हाताची जखम भरायला बराच वेळ लागणार होता थोडा विकनेस पण होता स्मित हळूहळू विचारायला सुरुवात केली सुरुवातीला तिला काही सांगण्याची इच्छा नव्हती पण तिची समुपदेशन करून विश्वास देण्यात आला स्मिता सांगत होती माझ्या सर्व मित्रांकडे खूप छान छान मोबाईल आहेत माझ्याकडे खूप साधा आहे यामध्ये व्हिडिओ इतर गोष्टी चांगल्या प्रकारे दिसत नाही माझ्या मैत्रिणी नेहमी म्हणायच्या छान मोबाईल घे पण आई नेहमी पैशाचा कारण सांगायची त्या दिवशी आम्ही बाहेर गेलो होतो तर सर्वांसमोर मला खूप कमी कमी वाटत होते माझ्या मोबाईल मध्ये फोटो पण येत नव्हती सोशल मीडियावर माझे मित्र मैत्रिणी लावी असायच्या त्यावेळी माझा मोबाईल व्यवस्थित चालायचं नाही मला खूप राग यायचा त्यादिवशी ठरवलं आईकडून नवीन मोबाईल घ्यायचा म्हणून मी सारखी आईच्या मागे लागली मला नवीन मोबाईल घे मी सर्वांना सांगून ठेवले होते मी आय फोन घेणार म्हणून पण आई म्हणाली मी नाही घेऊ शकत मग मी कॉलेजला गेलीस नाही मित्र-मैत्रिणी फोन करायची कधी येणार म्हणून मला खूप राग येत होता आईचा दिवसभर मग मी घरीच होते त्या दिवशी ठरवलं आई माझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही आता मित्र-मैत्रिणी असतील मजाक उडतील मग मी ठरवलं आणि रागामध्ये स्वयंपाक घरातील सुरीने हातावर मारलं पण तो जास्तच लागला मला काही कळालेच नाही मी बेशुद्ध झाली ज्यावेळेस शुद्धीवर आली तेव्हा येथे हॉस्पिटलमध्ये होते स्मिता सांगत होती मला आता खूप वाईट वाटते त्यानंतर स्मिताला मेडिसिन सोबत समुपदेशन व सीबीटी द्वारे तिला वास्तविक व काल्पनिक सकारात्मक नका म्हणून सत्य परिस्थिती काय या सर्व गोष्टी सांगण्यात आले स्मिता च्या आईला पण समुपदेशातून सर्व गोष्टी सांगण्यात आले मुलीचे सर्व हट्ट पुरवणे म्हणजे सांभाळणे होत नाही तिला आपल्या परिस्थिती जाणीव जाणीव पण करून द्या भविष्याबद्दल काय करायचे तुझ्या आवडीनिवडी याबद्दल ओळख करून द्या मित्र-मैत्रिणी कोण आहेत कशी असायला हवी ही पण सांगा स्मिताने खरंतर घरी कोणीही नसल्यामुळे आपण जग फक्त मोबाईल सोशल मीडिया वेब सिरीज हेच बनवले होते त्यात मित्र कुठली निवडायचे आपली परिस्थिती काय याची थोडी जाणीव स्मिताला नव्हती आभाशी जगामध्ये वावरल्यामुळे एकांत इंटरनेट एडिकशन नकारात्मक विचार रात्रीला सारखी मोबाईल भविष्याबद्दल निश्चित ध्येय नसणे व्यवस्थित मार्गदर्शन नसणे यामुळे अशा गोष्टी घडतात स्मिता आता रेगुलर फॉलोसाठी येते आईला मदत करते आईपण वेळ देते सर्व परिस्थिती तिला जाणीव झाली होती आज सहा महिन्यांमध्ये स्मिता मध्ये बरेच बदल झाले अथर्व व स्मिता अशा अनेक केसेस आहेत काही आपल्यापर्यंत पोहोचतात त्यांचे जीवन बदलून जाते चुकीच्या सवयीतून आई-वडिलांचे निष्काळजीपणामुळे किंवा त्यांच्या प्रेशर मुळे मुले काही बोलत नाहीत परिणामी ते त्यांचे वेगळेच निर्णय घेतात, अनेक जण व्यसनाच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेतात काहीजण नैराश्यामध्ये योग्य सल्ला मार्गदर्शन न मिळवणे आपले जीवन संपवतात आज समाजामध्ये चुकीच्या समजूती, वाढत जाणारी व्यसनाधीनता, मोबाईलचा अतिवापर एक एकटेपणा, वाढती स्पर्धा कुटुंबामध्ये संभाषणाचा अभाव मुलांना समजून घेण्यापेक्षा त्यांचे आवडीनिवडी कौशल्य ओळखण्यापेक्षा घरच्यांच्या सांगण्यावरून निवडलेली क्षेत्र आर्थिक परिस्थिती संभाषणाचा अभाव या सर्व गोष्टीमुळे तरुण मुलं-मुली भावनिक रित्याच हसून जातात परिणामी नैराश्यामध्ये जाऊन झोप कमी होणे भविष्याबद्दल नकारात्मक वृत्ती व्यसनाधीनता चिडचिडपणा वाढणे कशातही मन न लागणे जीवन कमी होणे वजन कमी किंवा जास्त प्रमाणात वाढणे काहीही करावीस न वाटणे आत्महत्येचे विचार येणे वरील प्रमाणे लक्षणे आढळल्यास शासनाने सुरू केलेल्या टोल फ्री 14416 व 104 या हेल्पलाइन चा वापर करा किंवा माननीय जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली OPD क्रमांक 35 प्रेरणा प्रकल्प शेतकरी समुपदेशन व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम कक्ष स्थापन करण्यात आला यामध्ये मोफत समुपदेशन आवश्यक उपचार करण्यात येतात .
सुदृढ मानसिक आरोग्यासाठी
नियमित व्यायाम करा.
मेडिटेशन, विपश्यना, योगा नियमित करा.
जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
व्यसनापासून दूर राहा ( दारू, ताडी, गांजा, तंबाखू आधीचे व्यसन टाळा ).
आठवड्यातून एक दिवस स्वतःसाठी द्या
कुटुंबामध्ये नियमित संभाषण हवे कुठल्याही मानसिक समस्या जाणवल्यास मानसोपचार तज्ञ मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक यांचा सल्ला घ्या
नकारात्मक चुकीच्या मार्गदर्शन करणाऱ्या मित्रांपासून व्यक्तीपासून दूर राहा।
रात्रीच्या वेळी मोबाईलचा अतिवापर टाळा ,अतिप्रमाणात मोबाईल इंटरनेट ,सोशल मीडिया, वेब सिरीज बघणे टाळा किंवा आपल्या मुलांना याबद्दल मार्गदर्शन करा
मुलांमध्ये झोप कमी होणे, चिडचिडेपणा वाढणे, सारखा सारखा मोबाईल मध्ये पाहणे कमी बोलणे, वर्तन बद्दल जाणवल्यास त्याला प्रेमाने समजून घ्या त्याच्याशी संवाद साधा आपण सर्व एकत्र येऊन समाजात जनजागृती करूया, आत्महत्या थांबवूया .
“नको दुरावा द्या आधार बरी होतील सर्व मानसिक आजार”.
डॉ.कैलास चव्हाण
चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ(प्रे.प्र)
जिल्हा रुग्णालय, नांदेड
मो.9970309030
शेअर करा..