माझा देश, जगात नेक ! |
माझा देश, जगात नेक |
भारत भाग्यविधाता, |
विविध धर्म, नाना वेष |
अनेक अष्टपैलू भाषा. |
दिवसागणिक प्रगती आपली |
करुनी उत्तुंग शिखर सर, |
साहित्य, क्रीडा, विज्ञान असो |
व असो कलेचा सागर. |
माझा देश, जगात नेक |
भारत भाग्यविधाता, |
चंद्र, सूर्य, मंगल समेत |
मोहिमा अनेक गुण गाता. |
उत्तम शेतमळे, रस्त्याचे जाळे |
योग्य स्थान सर्व धर्मांना मिळे, |
अशा या आपल्या भारतभूमीत |
प्रगतीला खुले हे आकाश निळे. |
“कविमोल” अमोल बारई |
शेअर करा..