💦 *माझी कविता..*
शीर्षक : *आता तरी सांगा..*
💧🔥💧
रांगता रांगता चालायला लागलो,
चालता चालता पळायला लागलो..
पळता पळता कळायला लागलं,
कळता कळता शिकायला लागलो..
शिकता शिकता वळायला लागलं,
वळता वळता शोधायला लागलो..
शोधता शोधता बघायला लागलो,
बघता बघता कमवायला लागलो..
कमवता कमवता रमायला लागलो,
रमता रमता हसायला लागलो..
हसता हसता रडायला लागलो,
रडता रडता जगायला लागलो..
जगता जगता मरायला लागलो,
आता तरी सांगा काय चुकीचं वागलो..?
🔥💧🔥
कवी………. 🖋️
©® – सुभाष कासार.
नवी मुंबई.. 💦
शेअर करा..