कठोर परिश्रम

माझे बाबा सायकलरिक्षा चालवायचे, आई चार मोठ्या घरांची भांडी घासायला जात होती, बहीण आजारी असल्यामुळे झोपून असायची. मोठा भाऊ शाळा सोडून वाईट मित्रांसोबत फिरत असायचा. मी सर्वात लहान होतो , मला परीस्थितीची जाण होती. त्यामुळे मी लहानपणीच स्वत: ला सवय लावली आणि वयाच्या 10 व्या वर्षापासूनच शाळा शिकत-शिकत शिक्षकांची छोटी-मोठी कामे करण्यास सुरुवात केली. त्या कामाचे मला काही दहा – वीस रुपये मिळायचे, ते मी आईकडे द्यायचो आणि कंदिलाच्या प्रकाशात नियमित अभ्यास करायचो. बाबा आले तर, त्यांच्या पायांना चेपुन द्यायचो. आईचे काम करुन लाल झालेल्या हाताना पाहुन मला त्रास व्हायचा..      एकदा मला शाळेत जायला उशिर झाला, शिक्षकांनी कारण न विचारता, मला खुप मारलं पण मला माझ्या कष्ट करणार्या बाबांना पोटभर अन्न द्यायच होतं म्हणून मी , एका काकांच्या घरी एक तास त्यांचे बूट साफ करायला गेलो होतो. शिक्षकांच्या मारण्याचा त्रास होत नव्हता मला, त्याहीपेक्षा कित्येक पटीने त्रास या गोष्टीचा झाला की माझ्या बूट साफ करण्याच्या मोबदल्यात मला थोडेसेच अन्न मिळाले. पण त्या अन्न्नामध्ये आई आणि बाबांचं पोट भरणार का नाही मला माहित नाही पण मला येवढ माहित होतं त्यांच्या पोटात काहीतरी गेल्याच समाधान तरी नक्किच मिळेल याची मला खात्री होती. आई बाबा दोघांच्या डोळ्यातून अश्रू  वाहू लागले. आणि आई म्हणाली “माझं बाळ मोठं झालं आता” हे असं झालं होतं. आणि शाळा सुटली मी घरी आलो. आई बाबा घरी आले होते , अचानक माझ्या लहान बहीणीचा ताप वाढला, इतक्या रात्री कुठे घेऊन जावे समजेना, दवाखाना घरापासून खुप दुर होता. शिवाय आई आणि बाबांचे मिळुन साठ-सत्तर रुपये मिळायचे. आम्ही बाबांच्या सायकल रिक्षामध्ये तिघे निघालो. दवाखाना दुर असल्यामूळे आम्ही तिथे पोहचू शकलो नाही. तिथेच माझ्या बहिणीचा जीव गेला. तिच्या नसण्याने घर खायला उठत होतं. तिच्या आठवणी मनातून जातच नव्हत्या….. परिस्थितिने आलेल्या परिस्थितीवर मात करत आयुष्य जगायला शिकवलं. कष्ठ करत , आपल्यांंसाठी जगायला शिकवल……

विजया विष्णू पाटील

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments