ज्ञानाचे तुला पंख दिले रे
उडण्याचे त्यात आहे बळ
पक्षी म्हणूनि उड माणसा
कसले तुला रे भय .
उडण्याचा तू कर प्रयत्न
सांभाळून तोल
एक दिवस मिळेल तुला रे
ज्ञानाचे मोल .
तुझ्या पंखात आहे
उडण्याची अफाट शक्ती
जीवन जगण्याची
सुचवेल तुला रे युक्ती.
प्रगतीचे आकाश आहे
तुला फिरण्यासाठी खुले
झेप घे आकाशात
उडता येईल तुले .
बुद्धीचे तुला मडके दिलेरे
पाणी भर त्यात ज्ञानाचे
जीवनाचा प्रवास करता
येईल तुझ्या कामाचे.
शेअर करा..
Very nice poem