अल्लड मेघ आणि तिचा सुर्य ! 🌤️

१५.६.२०२४

आज का कोण जाणे, त्याचा ताप काही मला सहन होत नव्हता. त्यावर इतकं प्रचंड प्रेम करणारी मी आज त्याच्या ह्या संध्याकाळच्या रूपाकडे देखिल उघड्या डोळ्यांनी बघु शकत नव्हते. कदाचित त्याला ही काही वेळ आरामाची गरज होती. त्याचाही आठवडा खुप त्रासदायक गेला असेल म्हणुनच संध्याकाळच्या या वेळेस जेव्हा त्याचे जे रूप शांत भासायला हवे होते ते आज मला प्रखर भासत होते.

मी नेहमीप्रमाणेच आमचा वेळ व्यतीत करायला त्याच्या समोर आले. त्याच्यावर इतकं प्रचंड प्रेम करणारी मी ; खरंतर त्याचे हे सायंकाळचे प्रखर रुप बघुनच समजुन घ्यायला हवं होतं की आज माझ्या भास्कराची स्थिती काही बरी दिसत नाही. कमित कमी त्याची विचारपुस तरी करायला हवी होती. पण प्रेमाचे हे भुत डोक्यावर चढवुन ठेवलेली मी नकळत त्याच्या समोर व्यक्त होऊन बसले. खरंतर पुर्र्णपणे नकळत नाही; थोडी कल्पना आधिपासुन असताना ; सर्व गोष्टींचा नीट विचार न करताच नेहमीच्या सवयीनुसार त्याच्यासमोर व्यक्त होत गेले. आणी त्याला अजुन अस्वस्थं केले.

सायंकाळची ती वेळ असल्यामुळे आपला दिनकर आपल्यापासुन आता दुर होईल ह्याच एकेरी स्वार्थी विचाराने पुढचं काही विचार करायची बुद्धीच जणु काही मंदावली होती. थोडं त्याच्या द्रुष्टीने पण विचार केला असता तर कदाचित हे लक्षात आलं असतं की  दिवसभर जगाचा एका बाजुचं भार सांभाळल्यानंतर त्यालाही आता थोड्या निवांतपणाची गरज आहे.

स्वताला जरा समजावलं असतं की नेहमी देतो ना तो तुला तुझा वेळ मग थोडा वेळ आता तु ही त्याला जरा समजुन घे. मी त्याच्या भावनांचाही थोडा विचार करायला हवा होता. पण मी तो नाही केला.  आणि परीणाम.. त्याचा ताप कमी होण्याऐवजी अजुन वाढला. ते तर साहजीक आहे ना. कसा संताप वाढणार नाही कोणाचा ? ….

तर आता हे सगळं होऊन गेलं आहे आणि ते आता बदललं जाऊ शकणार नाही. परिणामी पदरात पडली भयंकर काळी रात्र … एका वेगळ्याच अस्वस्थतेने भरलेली, एक वेगळ्याच विचारांनी दाटलेली… जणुकाही जगातलं सगळं सुखंच नाहीसं झालं आहे. एका वेगळ्याच नैराश्याने भरलेली ही रात्र कधी एकदाची संपेल हीच हुरहुर आता मनाला लागुन आहे ….

Megh

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments