कृष्णा

कृष्णा

———–

कृष्णा

दहयाच्या आशेनं

तू जो काय उपद्व्याप केलास

त्या वेळी गम्मतीचा

तुझा तो खेळ

आता खेळवतोय आम्हा पामराना

तेव्हा तू तुझी चोरी

आटपली असशील दोन किंवा तीन थरात

इथे संपलाय आमच्या राजकीय नेत्यांचा

थरही आणि उरला सूरला स्तरही

कृष्णा

तू सांगितलीस

अर्जुनाला गीता विराट रूप घेऊन

आणि आंधळ्या धृतराष्ट्राला संजयाने

कथन केली दूर दृष्टी ठेवून

आता नागवली जातेय द्रौपदी

दुशासनाकडून बिनदिक्कत   

नि आमचा आंधळ्याचं  सोंग घेतलेला धृतराष्ट्र

बसलाय गांडीवर हात ठेवून चूप चाप

हिटलर रूप घेऊन  

आणि शोधतोय संजयाला

तो कथा कथन करेल या आशेवर  

नौटंकी करून

आता तर कथा कथन करणाराच

पळालाय धूम ठोकून

गोदी मीडियातल्या पत्रकारासारखा !

 

            प्रसाद सावंत

 

प्रसाद श्रीधर सावंत

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments