मन चिंब झाले |
मी तुला, अन् तू मला पहिल्यांदा पाहिले, |
घन ओथंबून आले आणि मन चिंब झाले. |
तू ज्याक्षणी एकरूप झालीस, |
मोरपंखी स्वप्न पूर्णत्वास आले. |
एकमेकांत गुंतल्याने आपले, |
आसमंत स्वच्छंद झाले. |
तूच होती जीची आर्ततेने, |
वाट बघण्यात कित्येक युग गेले, |
रुक्ष या जीवनी स्वरतार झंकारले, |
सूर हे सरगमी पुनः एकदा लागले. |
कित्येक दिवसांनी तू भेटशील नव्याने, |
ह्याची गुंतागुंत मनात होतेय. |
दिवसामागून दिवस जाताहेत, |
मन माझे गुरफटतेय… वाट बघण्यात..! |
“कविमोल” अमोल बारई |
शेअर करा..