ग्रीष्म |
ग्रीष्माच्या मोसमातले कडाक्याचे उन्ह, |
उन्हाच्या दाहकतेने शरीर होते सुन्न: |
घामांच्या धारांमध्ये दिवस सारा सरतो, |
सरतेशेवटी उद्याचा मनामध्ये धाक भरतो. |
काम करण्याच्या इच्छा साऱ्या मरतात, |
बुट्या मारण्याची कारणे मनामध्ये भरतात. |
पण, |
गुलमोहर नेहमी उन्हातच बहरतो, |
उन्हाच्याच दाहकतेत आंबाही मोहरतो. |
पिंपळाच्या पानांची होते ग्रीष्मात गळती, |
आणि फुटते त्यांना नवीन कोवळी पालवी. |
हयांच्यापासून शिकावे जगायचे कसे ठाम, |
उन्हामध्ये उभे राहून करावी त्यांच्या करडेपणावर मात. |
निसर्गसुद्धा नेहमी काहितरी शिकवितो, |
झाडांच्या माध्यमातून आपल्याला दर्शवितो. |
जीवनातही असतात कित्येक उन्हाळे, पावसाळे, |
सुख: दुःखाच्या रुपात कारणे असतात निरनिराळे. |
जरी लागली गळती दुःखाच्या स्वरूपात, |
नव्याने करावी जीवनाची सुरुवात. |
“कविमोल” अमोल बारई |
शेअर करा..