पडे आषाढाची सर,
मन आनंदले फार,
फिटे पारणे डोळ्यांचे,
रूप पाहूनी पिकांचे. ॥१॥
होता सुर्याचे दर्शन,
मन जाई आनंदून,
आता आलेल्या सरीने,
पुन्हा गेलं भांबावून. ॥२॥
स्वच्छ हिरवा निसर्ग ,
जणू धरतीच स्वर्ग,
येता नदीला तो पूर,
मना लागे हुरहुर.॥३॥
✒मिलिंद कुलकर्णी, दानोळीकर
१५ जुलै २०२२
शेअर करा..