मराठीसाहित्य.कॉम वर आपले स्वागत आहे..

“अमृतातेही पैजा जिंके” असं श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्याचे वर्णन केले आहे ती आपली मराठी भाषा म्हणजे अनेक साहित्यालंकाराने सजलेली समृध्द खाण आहे. साहित्याच्या विविध प्रकारात आपल्या कल्पकतेने आणि प्रतिभेने सतत भर घालणारे सरस्वतीपुत्र मराठीला जितके लाभले तितके फारच थोड्या भाषांना लाभले असतील. अशा या समृध्द मराठीचा वसा आणि वारसा जगासमोर मांडणारे आपले व्यासपीठ म्हणजे, मराठीसाहित्य.कॉम 

साहित्य म्हणजे प्रवास.. प्रवास उगमापासून – अस्ता पर्यंतचा , भाषेपासून -भावने पर्यंतचा. आणि ह्या साहित्याची जननी असलेल्या मराठीला अगदी संतांपासून ते आत्ताच्या नवलेखकांपर्यंत मराठीवर प्रेम करणाऱ्या या तुम्हा आम्हा साहित्यिकांनी समृद्ध केल आहे. जशी ही भाषा साहित्यिकांच्या लिखाणाने समृद्ध होते तशीच तिला लाभलेल्या ह्या प्रचंड वाचक परंपरेने ही होते. साहित्याला वाचकांची दाद मिळाल्याशिवाय साहित्य पूर्ण झालं असं कधीच म्हणता येणार नाही. साहित्याला वाचक, रसिकांपर्यंत पोहचवणे ह्याच कल्पनेमधून मराठी साहित्य डॉट कॉम ची निर्मिती झाली, आज साहित्यिकांना त्यांच्या वाचक रसिकांपुढे पोहोचवण्याचे काम मराठी साहित्यच्या माध्यमातून सतत चालू आहे आणि यापुढेही राहील.

आपण लेखक आहात का?

तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयांवर काहीतरी सुचतंय?? तुम्हाला शब्दांमधून व्यक्त व्हावसं वाटतंय?? तर मग “मराठीसाहित्य.कॉम“ चे व्यासपीठ आपल्यासाठी खुले आहे…इथे आपण मनमोकळेपणाने आपल्या भावना वाचकांपर्यंत पोहचवू शकता. वाचकांची दर्जेदार मराठी साहित्य वाचनाची तसेच आपली लेखक म्हणून उदयास येण्याची इच्छा आपण पूर्ण करू शकता. आपण ह्या वेबसाईटवर सर्व प्रकारचे लेख, कविता, कथा अथवा कथांच्या मालिका, पाककृती, नाटक-सिनेमा यांवरील आपले परीक्षण, प्रवासवर्णने आणि इतरही अनेक प्रकारच्या साहित्याचे लिखाण करू शकता.

:: नोंदणी करण्यासाठी कृपया येथे क्लिक करा ::

पुस्तक  साहित्य

झेप क्षितिजापलीकडे

डॉ. चित्रलेखा पुरंदरे
अधिक माहिती

ययाती

वि. स. खांडेकर
अधिक माहिती

संभाजी

विश्वास पाटील
अधिक माहिती

सागरा प्राण तळमळला

रवींद्र भट
अधिक माहिती

अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा

प्रल्हाद लुलेकर
अधिक माहिती
जाहिरात