लेखक नोंदणी

तुम्हाला तुमच्या आवडत्या विषयांवर काहीतरी सुचतंय??
तुम्हाला शब्दांमधून व्यक्त व्हावसं वाटतंय??
तर मग “मराठीसाहित्य.कॉम” चे व्यासपीठ आपल्यासाठी खुले आहे…

साहित्य प्रदर्शित करण्यासंबंधी काही नियम व अटी :-

# लेखक म्हणून नोंदणी करण्यासाठी आपले कोणतेही एखादे साहित्य आम्हाला पाठवणे अनिवार्य आहे.
१. आपण आपले साहित्य “Marathi Unicode Font” मध्ये प्रदर्शित करू शकता. ऑनलाईन मराठी टाईप करण्यासाठी Google Marathi Typing Tool येथे क्लिक करा.
2. आपल्या साहित्यासाठी योग्य श्रेणीचा उल्लेख करा, तसेच साहित्याला साजेशी एखादी कव्हर इमेज जोडा. कव्हर इमेज, तुमच्या स्वत:च्या मालकी हक्काची अथवा पब्लिक डोमेन (Pixabay.com) येथून घेतलेली असावी. कृपया गुगलवरून डाउनलोड केलेल्या इमेजेस टाकू नयेत, त्यामुळे कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन होते.
३. सदर साहित्याच्या / लेखाच्या शेवटी आपले नाव प्रसिद्ध केले जाईल.
४. मराठी साहित्य डॉट कॉम साहित्य चोरीचे समर्थन करत नाही. लेखकाने पाठवलेल्या अथवा वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या साहित्याची जबाबदारी ही सदर लेखकाची असेल. कृपया लेखकांनी स्व-लिखित साहित्य आम्हाला पाठवणे अथवा वेबसाईटवर प्रकाशित करणे अपेक्षित आहे. अन्यथा कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन होते आणि त्यास मराठीसाहित्य.कॉम वेबसाईट किंवा या संस्थेचा कोणताही व्यक्ती जबाबदार असणार नाही. अश्या प्रकारचे साहित्य आम्हाला आढळल्यास ते साहित्य मराठीसाहित्य.कॉम वरून काढण्यात येईल याची कृपया सर्व लेखकांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती..
५. साहित्य प्रदर्शित करण्याचा अथवा प्रदर्शित साहित्य हटविण्याचा अंतीम निर्णय हा मराठीसाहित्य.कॉम चा असेल.

# आम्हाला आपले साहित्य प्राप्त झाल्यावर आपल्याला लेखक म्हणून नोंदणी झाल्याचा ईमेल प्राप्त होईल. त्यानंतर आपण पुढचे साहित्य https://marathisahitya.com/add-new-article/ या लिंक वरून पाठवू शकाल.