जोगाई सभामंडप (हत्ती खाना)

# महत्वाची टिप-
सध्या या लेणी खुपच दुर्लक्षित आहे. याच कारणामुळे इथे शहरातील व्यसनी लोक या जागेचा वापर करतात. कोणीही ऐकटे इथे जाणे टाळावेच.तसेच सोबत टॉर्च घ्यावा आणि लेणीच्या खोल्या मध्ये प्रवेश करण्यापूर्वी ती सर्व बाजुनी सुरक्षित असल्याची खात्री करावी. उदा. साप, वटवाघूळ इ.

# पुण्यापासून अंतर- ३४० किमी

#आजुबाजुची पर्यटनस्थळे- बारा खांब महादेव मंदिर

# जाण्याचा मार्ग- पुण्यात वाकडेवाडी बस स्थानकामधून अंबाजोगाई लालपरी किंवा बऱ्याच खाजगी ट्रॅव्हल्स आहेत

# लेणीची माहिती-
जोगाई सभामंडप लेणी (हत्ती खाना) ही योगेश्वरी मंदिराच्या उत्तर-पश्चिमेस अर्धा किमी अंतरावर जयंती नदीच्या किनाऱ्यावर स्थिर आहे. ही लेणी चौकोनी आकाराची असुन पुर्ण ऐकाच अखंड दगडात कोरलेली आहे. खडकाच्या दक्षिणेला गुहेमध्ये प्रवेश करावे असा भास होतो. तिथुनचा आतमध्ये जाता येतं. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर उजवीकडे-डावीकडे दोन साधारणपणे १५/२० दरम्यान फुट उंचीचे पुर्णतः दगडात कोरलेले हत्ती आहेत. ऐक पाण्याचा टाका आहे.
पटांगणाच्या बरोबर मध्ये सुंदर नंदिमंडप कोरलेला आहे. त्या आकार हा ९.१४×९.१४ मि इतका आहे. त्यात आतल्या बाजुने आणखी बरिच शिल्प कोरलेले आहेत. ज्याची सध्याची स्थिती वाईट आहे. पुढे गेल्यानंतर आणखी प्रचंड मोठ्ठे २ कोरीव हत्ती आहेत ज्याची उंची साधारणपणे २५ फुट उंच आहे. तिथु पुढे आपण लेणीच्या मुख्य भागात प्रवेश करतो. जिथे ४ आणखी खोल्या आहेत पण त्या अपुर्ण आहेत. परंतु भिंतीवर कोरलेली शिल्प बरीच आहेत. तिथे ऐक शिलालेख सापडला होता जो सध्या सुरक्षिततेसाठी तहसीलदार कार्यालयात आहे. ज्यामध्ये हा शिलालेख १०६६ चा असलेल्याचा आहे सोबत राष्ट्रकुट राजा महामंडलेश्वर उद्यादित्ययाने सेलु,सजीव, राजीव, जळगाव, आणि कुंभमेळा ही गावे हत्तीखान्याच्या लेणी परीक्षणासाठी दान केल्याचा उल्लेख आढळतो. म्हणजे या लेण्या त्यापेक्षा सुध्दा जुन्या असाव्यात.
या लेणी महाराष्ट्र प्राचीन व स्मारके व पुराण वास्तुशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० नुसार राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.
तसेच या लेणी पासुन साधारणपणे १ किमी अंतरावर बारा खांब मंदिर आहे. ज्याचे उत्खननाचे काम चालु आहे ज्यामध्ये मंदिराच्या आजुबाजूला बरिच शिल्पे सापडलेली ठेवण्यात आलेली आहे. पण ते काम पूर्ण झालेले नाही. मी त्या सर्वांचे फोटो अपलोड करणार आहे.

# जेवण्याची सोय- अंबाजोगाई शहारामध्येच जेवण मिळते. लेणी जवळ खाण्यासाठी काहीच नाही.

# पाण्याची सोय- टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य नाही, त्यामुळे पाणी सोबत घेऊन जावे

# मार्गाची स्थिती- अंबाजोगाई शहराला जोडणाऱ्या रस्त्याचे काम चालु आहे.

# प्रवासखर्च- १०००/- पुणे ते अंबाजोगाई ए. टी बसचा तिकीट दर (पुणे ते पुणे) २० अंबाजोगाई ए. स.टी स्टॅण्ड ते लेणी रिक्षाने

# टिप- हि भटकंती मी कोरोना व्हायंरस पसरण्यापुर्वी केलेली आहे. कोरोना व्हायरसला आळा घालण्यासाठी सरकारच्या सर्व उपाययोजनांना सहकार्य करावी ही विनंती 

For more details please contact – [email protected]
Facebook- facebook.com/sudarshan.bairagi.12

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments