बावडेकर वाडा

# पुण्यापासून अंतर – 290 किमी { फक्त जाणारा }

# आजुबाजूची पर्यटन स्थळे-
*कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर
*शाहु राजवाडा/ नवीन जुना
* किल्ले गगनगड
*निसर्गरम्य गगनबावडा घाट

# रामचंद्र पंत अमात्य यांचा इतिहास-

छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात अंगाच्या , बुध्दिमत्तेच्या, आणि पराक्रमाच्या जोरावर जी घराणी पुढे आली त्यापैकी रामचंद्र पंत अमात्य हे ऐक अत्यंत प्रमुख घराणं. रामचंद्र पंतानी मुत्सद्देगिरी करून ही नावलौकिक मिळविला. पंतांचा सर्वात मोठा उल्लेख यासाठी इतिहासात नोंदविला गेला आहे कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि ताराबाई पुत्र शिवाजी महाराज (दुसरे) तसेच राजसबाई पुत्र संभाजी महाराज (कोल्हापूर) अशा पाच छत्रपतींची सेवा करण्याचा मान रामचंद्र पंतानी मिळविला आहे. सलग पाच छत्रपतीं राज्यकर्त्यांच्या काळात प्रधानपदावर राहुन कर्तव्य बजावणारे रामचंद्र पंत हे कदाचित एकमेव प्रधान असतील.
शिवराज्याभिषेक सोहळ्यात पंतांनी ” दधिपूर्ण ताम्रकलश “आदरपूर्वक उभे असल्याचा बखरीमध्ये उल्लेख आढळतो.
छत्रपती राजाराम महाराज कर्नाटक दोऱ्यावर गेल्यावर स्वराज्याचा कारभार हा दोन प्रधानाला झाली होती तरी त्यांचे प्रमुखही पंतच होते. छत्रपतींचे प्रशासकीय अधिकार दाखवणारे “हुकुमतपनाह” हे बिरूद महाराज्यांनीच त्यांना प्रदान केले होते. याचा अर्थ छत्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांचे अधिकार हे हुकुमतांना मिळत असे. अशा प्रकारे छत्रपतींच्या अधिकाराने रामचंद्र पंतानी स्वराज्याचा कारभार १६७९ ते १६९७ सलग आठ वर्ष केला. सात लक्ष सैन्य घेऊन दक्षिणेत उतरलेल्या महाबलाढ्य औरंगजेब बादशाही मराठी सैन्याचे नियोजन करून त्यांच्या सोबत लढण्याचे काम पंतानी केले. त्यावेळी त्यांना मोलाची साथ दिली ते म्हणजे संताजी घोरपडे, धनाजी घोरपडे, शंकरजी नारायण, धनाजी जाधव या नरवीरांनी आणि पुन्हा परमुलखात गेलेला प्रदेश जिंकून घेतला.
राजाराम महाराजांच्या काळातील कामगिरी ही पंताची सर्वश्रेष्ठ कामगिरी ठरली. महाराणी ताराबाई यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना ” मोडिले राज्य सुरक्षित ठेवीले ” या शब्दात वर्णन केले आहे.
निधनापूर्वी त्यांनी आज्ञापत्र नावाचा मराठेशाहीतील राजनितीवर विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या कार्यपद्धती राजनितीवर चिकित्सक ग्रंथ लिहिला आहे. मध्ययुगाच्या पाचशे प्रदिर्घ काळात हा राजनितीराजनितीशास्त्राराजनितीराजनितीशास्त्रावरील एकमेव ग्रंथ आहे. या घराण्याचे गगणबावड्याची वंशपरंपरेने भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत होती. रामचंद्र पंत अमात्य यांचे ९ वे वंशज परशुरामपंत अमात्य यांनी १९३३ ते १९३५ या काळात हा वाडा बांधला.

# वाड्याची माहिती-
हा वाडा साधारणपणे ८५ वर्षाचा आहे. या वाड्याच्या प्रवेशव्दारावर २ तोफा आहे. ४ विरखळ आहेत. तसेच वाड्याच्या पहिल्याच खोलीत प्रवेश करताचा हा सर्व इतिहास तिथे लिहीलेचा उल्लेख आहे. आणि जिथे आता पुर्ण संग्रहालय तयार केलं आहे. ज्यामध्ये त्या काळातील तांबे – पितळेची भांडी अहेत. काही अंशी शक्त सुध्दा ठेवलेली आहेत. वाडा हा दोन मजली आहे. दुसऱ्या मजल्यावर प्रवेश करताच तिथे तुम्हाला ऐक खुप दर्जेदार आराम खुर्ची आणि महिलांची सौंदर्य प्रसाधने ठेवण्यासाठी विशेष पेटी ठेवली आहे.
वाड्याची वैशिष्ट्य पुर्ण बाब म्हणजे या वाड्याच्या प्रत्येक खोलीला बाल्कनी आहे. तसेच हा वाडा खुप जोरदार कोरळणाऱ्या भागात येतो. त्यामुळे इथे विज कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन त्या काळात म्हणजे ८५ वर्षापुर्वी संपुर्ण वाड्याला १० गुठ्यांत आर्थिंगची वायर टाकण्यात आली आहे. हा वाडा संग्रहालय असल्यामुळे या वाड्याच्या आतील भागातील फोटो नाहीत. हा पुर्ण वाडा सागवान – शिसे या लाकडापासुन आणि दगडात बांधला गेला आहे.

# मार्गाची स्थिती –
संपुर्ण रोड हा सुरूवातीपासून शेवटपर्यंत खुप उत्तम आहे.

# जेवणाची सोय –
हा वाडा पळसंबी गावात आहे जिथे जेवण्याची सोय सहज उपलब्ध होते.

# पाण्याची सोय-
वाड्यामध्ये पाणी सुध्दा सहज मिळते.

# प्रवासखर्च-
मी मारूती सुझुकिच्या व्हगेनार गाडीने प्रवास केला होता. ज्यासाठी मला ३००० खर्च आला होता. पण त्यावेळी मी बराचसा आजुबाजूला भाग फिरलो होतो साधारणपणे ६०० किमी. गाडी हि सीएनजी होती.

# टिप-
या वाड्यामध्ये बऱ्याच मराठी चित्रपटांची शुटिंग झाली आहे. आपण सर्वजण याला “झपाटलेला” या चित्रपटातील वाडा याच नावाने ओळखला जातो. काही ग्रामस्थे पोटी भुतबंगला या नावाने ओळखतात यात चित्रपटाच्या शुटिंग नंतर परंतु प्रत्यक्षात मात्र इथे कोणतीच अशी घटना नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!