मी आणि संस्कृत

आज लॉकडाउनच्या काळात पुन्हा रामायण बघण्याचा योग आला. तस रामायण मी माझ्या लहानपणी म्हणजे मी ५-६ वर्षाचा असताना बघीतले होते. पण तेंव्हाचे मला आता येवढे आठवत नाही. पण वर्क फ्रॉम हॉम करताना अधून-मधून पटकन हॉल मध्ये जाऊन रामायणाचा थोडा भाग बघायचा आणि पुन्हा काम सुरू करायचे असा नित्य क्रम. रामायण संपले आणि उत्तर रामायण सुरू झाले. सितेने वनवास पत्करला आणि ती आता व्यास हृषींच्या आश्रमात येणार त्या आधीचा एक सिन बघण्याचा येग आला. त्यात असे दाखवले गेले की शाप देतादेता वाल्मीकीच्या तोंडून शापाच्या स्वरूपात जगातील पहीले काव्य रचले गेले. भले ते चार ओळीन्चे का असेना पण पहीले काव्य हे संस्कृत मध्येच बोलले गेले. जन्माने भारतीय पण कर्माने अमेरीकी असणाऱ्या आत्म्याला पहील्यांदा हलवून टाकले.

शाळेत असताना तिसरी भाषा ही संस्कृत होती पण त्याचा अभ्यास केवळ पास होण्या पुरता करायचा येवढाच डोक्यात विचार असायचा. संकृत गद्याचे मराठीत भाषांतर करा आणि “स्कोरींगचे” मार्क मिळवा हा तेव्हाचा ट्रेंड होता. पण त्यातूनच संस्कृतची तोंड ओळख झाली. “किम्‌ त्वम नाम” ह्या वाक्यात आमचे संपुर्ण संस्कृत सम्पून जायचे. पण जेंव्हा सहज गुगल केले तेंव्हा कळाले की जगातील सगळ्यात मोठे काव्य हे संस्कृर मध्ये लिहले गेले आहे. ते म्हणजे रामायण आणि महाभारत.

आता माझे डोळे विस्फारले. आजपर्यंत ऐकलेल्या रामाच्या, हनुमानाच्या, कृष्णाच्या अर्जूनाच्या गोष्टी ह्या त्या काव्याचा केवळ एक भाग होता? तेही इतके खरे खुरे की प्रत्येक पात्राचा भुतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ हा एखाद्या घटने सारखा लिहला जावा? कालांतराने रामसेतू, द्वारका नगरी, रामजन्म भुमी यांच्या संशोधनातून ह्या कथा नसून भुतकाळात घडून गेलेल्या घटना आहेत यावर विश्वास बसायला लागला. पण…. आम्ही अमेरीकेसाठी काम करतो आमच्या साठी ते म्हणतील तिच पुर्व दिशा. आणि अचानक डॉ. राजीव दिक्षित यांचा एक व्हिडीओ पहाण्यात आला. ज्या मध्ये त्यानी सांगीतले होते की जर्मन भाषा ही संस्कृत मधुनच उदयाला आली आहे. त्याचे व्याक्रण हे संस्कृत मधूनच घेण्यात आले आहे. त्याची लिपी वेगळी असेल पण आत्मा हा मात्र भारतीयच आहे. जर्मनीची एअरलाईन कंपनी ’लोफ्ट हंसा’ म्हणजे संस्कृत मध्ये लुप्त हंस. डोकं चक्रावून जायला लागलं. आता मला मराठी असण्या पेक्षा भारतवंशी असण्याचा अभीमान वाटू लागला.

लहानपणी आई आजी आजोबा मला अनेक श्लोक स्तोत्र शिकवत त्यांचा अर्थ कधीच कळला नाही पण आज संस्कृत चे मराठीत भाषांतर करताना मिळवलेले उच्चांक्क मार्क मला आज नापास झाल्याची जाणीव करून देऊ लागले. लहान पणीचे श्लोक पुन्हा आठवू लागलो, भले ते चुकीचे म्हणत असेन पण आज हातात पुस्तक घेऊन संस्कृत वाचू लागलो. कालांतराने आणि अभ्यासाने श्लोकांचा अर्थ कळायला लागला. कोणाच्या तरी स्वप्नात येऊन काहीतरी सांगून ज एखाद्या धर्माची निर्मीती होत असेल तर माझी हिन्दू संस्क्रूती किती महान आहे याचा बोध होऊ लागला. मनाशी ठरवलं आपल्या कडून होईल तेव्हडी माझ्या भाषेची संस्कृतची सेवा करायची. पुन्हा माळ्यावरून अध्यात्माची पुस्तकं काढली वाचन सुरू केलं. शब्दांशी शब्द मिळवत आजही मी संस्कृत शिकत आहे. वाचत आहे आणि स्वधर्माला वाचवत आहे.

धन्यवाद

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments