का आलास?, कशाला आलास?
तुलाच ठाउक!
इउन काय केलंस, कुणाचा बा, कुणाचा लेक, भाव, कुणाचं कोण तर कुणाचं कोणं? नव्हं कुणाचं समधं घरचं इस्काटुन टाकलंस.
आरं वसाड पडलेल्या गावातल्या, शहरातल्या गल्ल्या बोळं बघीतल्यावर आंगावर आसा सर्रर्रकन् काटा इतु, जगावं का मरावं कायबी सुचत न्हाय, आपुलकीचा हात पाठीवरनं फीरवणारी माणसं लांबनचं हात जोडाया लागली.
पण बरं झालं तु आलास तुझ्या भ्यानं मिठ्या मारनं आता तरी थांबलं,
तस्करीच्या भ्यानं गुदमरल्याली हारनं, हात्ती आजुनं बरीचं जंगली जनावरं जंगलातचं काय पण रस्त्यावर पण थाटात फिरू लागली.
पण बरं झालं तु आलास तुझ्या भ्यानं माणसातलं जनवार मेलं अन् माणुस पुन्हा जिवंत झाला.
पण बरं झालं तु आलास माणसाच्या गुर्मीला टोला आसा दिलासं,
त्याचं वाऱ्यावरचं पाय जमनीवरं आणलंस, घरातचं बसवून पिंजऱ्यातल्या पक्षाचं जगंन कसं असतं ती दाखवलंस.
पण तु का आलास तुझ्यामुळं कीत्येकांचं घराणं उद्वस्त केलंस, डॉक्टर, पोलिस, स्वच्छता कामगार आशा असंख्य देवांला माझ्या तु कामाला लावलंस, त्यांच्या लेकरा-बाळापसनं वायलं केलंस, धिक्कार करतु तुझ्या आशा येण्याचा.
पण बरं झालं तु आलास तुझ्या भ्यानं माणसाला माणुसकीनं जगायला शिकवलं.
तु जा आता थाबुंनकसं मायचं आरडणं अन् गायचं हांबरनं काणासनी ऐकवतं न्हाय आता,
तु निघं आता माझा डॉक्टर, पोलिस, स्वच्छता कामगार माझ्या सोबत हाय!

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
1 Comment
Inline Feedbacks
View all comments
Rohan

Far sundar ahe. Utkrushta