तुझ्या मातीत लहानच मोठं झालो
खेळलो, बागडलो, धडपलो पुन्हा उठून उभा राहिलो.
पण मात्र डोक्यावर छत बांधायचं म्हणून, थोड्याश्या तुझ्या हिरवळीला बाजूला सारत कधी सिमेंट जंगल उभा केलं कळलंच न्हाय.
तू कधी रागावलीस – ओरडलीस, पण मी मात्र नवीन कल्पनेच्या मोहात वाहत अधोगतीच्या जवळ येतो हे मात्र माझ्या लक्ष्यात आलाच न्हाय.
आज मात्र मरणाच्या उंबऱ्यवार उभा हाय, माघ बघितल्यावर तुझी आठवण येते, पुढं बघतल्यावर प्रगतीचं शिखरं दिसतं, अन आसपास जणूकाय यमदेव माझा सखाच हाय?
पथावर चालता-चालता समोरच्या बिना बुडाच्या शिखराकडं बघून असा प्रश्न मनात उभा राहतो “नक्की चाल्लास कुठं?”
माय माझ्याकडून असंख्य झालेल्या चुका विसरून माफ कर असं म्हणताना चूक वाटते,
पण तुझ्या कुशीत हिरव्या पदराखाली मला शांत निद्रा घ्यायचीय !
तुझ्या काळ्याशार मातीत पुन्हा खेळायचंय !
तुला आज जागतिक पृथ्वीदिनाच्या शुभेच्छा देऊन लाजवायचं न्हाय,
पुन्हा एकदा तुझं देखणं रूप मला बघायचं हाय!
Nice…. keep it up..
Good message …