शंभर दीडशे लोकांची गर्दी, काही भिजलेले, काही एकमेकांना मदत करत होते.काही जण जेवढे हातात मावेल तेवढं समान घेऊन आलेले व ते व्यवस्थित आहे का हे पाहत होते. अन्न पाणी वाटप करणारे कितेक तर लोक होते. पुरामुळे बेघर झालेले जवळ जवळ ३०-४० कुटुंब त्या हॉल मध्ये होते.झुणका, भाकरी, भात,  जे मिळेल ते आणून   प्रतेक जन मदत करण्याचा  प्रयत्न करत होता.मी सुद्धा आमच्या मित्रांसोबत काही बिस्किटे आणि केळी वाटण्यासाठी तेथे गेलो होतो.प्रत्येकाच्या हातात जाऊन ते देऊन त्यांना धीर देण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो.त्या येवढ्या मोठ्या हॉल मध्ये शंभर ते दीडशे लोकांडे पाहून एखाद संकट आपल्या परीवरावरती आल तर काय अवस्था होते याची अनुभाती मला तेथील वातावरण पाहून आली.

त्या येवढ्या मोठ्या हॉल मध्ये एका कोपऱ्यात मी एक बाईला पाहिलं. अंगावर नऊवारी साडी तीसुध्दा भिजलेली, थंडीने कुडकुडत मांडीत तोंड घालून ती बसलेली होती.बाजूला दोन लहान मूल होती अगदी निरागस पणे आपल्याला खायला कधी मिळतंय याकडे नजर लावून बसलेली.मी त्या मुलांजवळ गेलो माझ्या हातात केळी आणि बिस्कीट होती.मी ती त्यांना खायला दिल, पण अजुनही ती बाई तशीच बसलेली होती ना बाजूला कोणी पुरुष माणूस होता ना परिवारातील वाटावं असं ही कोणी न्हवत. मला वाटलं पुरात तिचा नवरा वगेरे.. पण मी जास्त विचार न करता.तिचे सांत्वन करण्यासाठी  मी तिच्या खांद्यावर न रहावुन हात ठेवला.तिने दचकून मान वर केली आणि मी भीतीने मागे सरसावलो..कपाळावर कुंकू नाही, डोळ्यात राग आणि अश्रू मला दोन्ही दिसलं. माझा विचार खरा ठरला अस मला वाटल.मी धीराने आणि अगदी सौम्य आवाजात तिला विचारल, “बाई तुमचे पती…?” ती अगदी द्वेषाने मला उत्तरली. “तो तर कवाच गेलाय मला सोडून, ही दोन पोरं पदरात टाकून.

“मला काही कळेनासं झालं.मी पुन्हा विचारलो,”मग परिवार…?” 
“ही दोन पोर, म्या आणि रंजी..!”  

रंजी हे नाव घेताच ती ढसाढसा रडू लागली, मी पुन्हा शांत झालो .मला वाटलं हीची बहिण वगेरे असावी.. ती रडता रडता पुन्हा बोलू लागली.”घर गेलं जवुद्या साहेब म्या पुन्हा उभा करीन. पर या पोरांचं पोट म्या कस भरू… म्या आणि पोरांनी लई प्रयत्न केला रंजील वाचवण्याचा.पर अमी रंजीला न्हाय वाचवू शकलो. आता तिच्या विना कमवायच काय अन् या पोरांना खायला काय घालायचं…” येवढं बोलून ती पुन्हा रडू लागली.मी तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होतो.पण गहिवरून आलेली ती पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्या समोर मन हलक करण्यासाठी पुन्हा बोलू लागली.

साहेब, यांचा बा कर्जा पाई समद रान त्या सावकाराच्या मड्यावर घालून, आत्महत्या करून मरून गेला.आणि माझ्या वर या दोन पोरांची जबाबदारी टाकून गेला.त्यो हरला पर म्या नाही साहेब.एक जमिनीचा तुकडा व्हता त्यावर झोपडी बांधून राहत होती.या पोरांना आणि रंजील सांभाळत होती.” ती पुन्हा पुन्हा रंजीच नाव घेत होती आणि माझ्या मनात एकच प्रश्न होता.. ही रंजी कोण असावी.. मुलगी..? की बहिण..? मी तिला विचारण्याचा प्रयत्न करत होतो पण स्वतला बोलताना ती थांबू शकत न्हवती. ती बोलत होती.”दोन वर्ष झालं साहेब, या पोरांना जीवच रान करून वाढवतेय. खूप दुःख बागितलीत आयुष्यात पर कवा माग नाय सरलो.पण या देवाच्या रागा समोर म्या काय बी नाय करू शकलो. आव साहेब आपण कासाबी जीव वाचवू .पर रंजी मुक जनावर, त्याला काय कळतय, ती नाय वाचवू शकली स्वताला.” अस म्हणून हंबरडा फोडून ती रडू लागली. तेंव्हा मला कळल की तिचं रडणं तिच्या नवऱ्यासाठी, तिच्या परिवरासाठी किंवा पुरात बुडालेल्या तिच्या घरासाठी न्हवत. ते होत तिच्या पुरात वाहून गेलेल्या म्हशी साठी आणि तेंव्हा माझ्या लक्षात आल की रंजी तिच्या म्हशीचं नाव होत.तिचे ते आश्रु बघून माझे सुद्धा डोळे पाणावले. पण ती बाई थांबतच नवती अगदी  मोकळ्या मनाने ती तीच दुःख माझ्या समोर मांडत होती.”साहेब खूप येळ लढली माझी रंजी.अव घरात पाणी येताना तीनच तर वरडून आमाला जाग केलं.अमी लगेच जेवढ समान हातात मावल तेवढं घेऊन घर सोडलं.पर पाणी वाढतच होता.म्या दोन खांद्यावर पोरं घेऊन एका हातात सामान अन् एका हातात रंजीचा दोर होता. पण्यातन वाट काढत आणि जात होतो.पायात खूप चिखल होत.माझे पण पाय चिखलात रुतत होत पर लगेच निगत बी व्हत, पर रंजी तिचं पाय लई मजबूत व्हत ते लवकर निघत नवत म्या दोर हातात धरून काटावर आली.पोरांना खाली सोडलं आन रंजीला वडू लागलो. आमच्या कड बगून रंजी हंबरडा फोडत व्हती.पुढं यायचा लई प्रयत्न करत होती. या आईच दुःख बहुतेक तिला बी कळल व्हत. म्या अन माझी पोर जिवाच्या आकांताने तिला बाहेर वाढत होतो. पर साहेब एकदमच पाण्याचा जोर वाढला, ती दिसणा झाली. तिचा श्वास गुदमरत व्हता म्हणून मान वर करत व्हती.पर पाणी इतकं व्हत की साहेब, रंजी नाय वाचली… ती गेली मला एकटीला टाकून.” अस म्हणून ती पदराने अपली डोळे पुसत होती.तिचे ते थरार कृत्य, तिची ती रंजीला वाचवण्याची धडपड एकूण माझ्या अंगावर काटे आले होते.एक स्त्री फक्त आपल्या म्हशीला वाचवण्यासाठी एवढा लढा देते हे एकूण मी थक्क झालो होतो.पण ती थांबत नव्हती, बोलतच होती.”आव साहेब ती गेली मला एकटीला सोडून पाण्यात वाहून, जवा या पोरांचा बा गेला तवाच म्या मरून जाणार होते.पर या रंजीकड बगून जिती होते. रंजीच दूध इकुन जो पैसा येत व्हता त्यात कस बस या पोरांचा पोट भरत होती. पर आता एकच विचार जीव खातोय, या पोरांचं पोट कशान भरायच.” तिने आपल्या पोरांच्या डोक्यावर हात फिरवलं. आणि त्यानंतर जे बोली ते ऐकून मी घाबरून गेलो.” वाटतंय ना या देवाण समदी दुःख माझ्याच पदरात टाकलीय.अस वाटतय ना की जिथं रंजी गेली ना तीतच जाव आणि या पोरांना घेऊन मारावी उडी.. जर यांना मी पोटलाच घालू शकत नसेल तर जगून तर म्या काय करणार.” अस म्हणत पोरांना पोटाशी घेऊन ती रडू लागली. मला काहीच कळत नव्हत तिची प्रत्येक गोष्ट दृश्य बनून माझ्या डोळ्यासमोर येत होत.त्या पोरांना पोटाशी घेऊन रडणाऱ्या बाई कडे पाहून माझ्या एवढच लक्षात आलं की ” त्या पुराच्या पाण्यात जिवाच्या आकांताने त्या म्हशीला ओढणारी ती बाई न्हवती ती एक आई होती”.

खरच आई किती महान असते याच आणखी एक उदहरण मला बघायला मिळालं.मी तिला मदत करण्याचे आश्वासन देऊन तिला धीर दिला आणि तीतून निघालो.पूर ओसल्यानंतर काही मित्रांच्या मदतीने तिची झोपडी पुन्हा उभी केली. तिला एक म्हैस घेऊन दिली. आता तीच नाव देखील “रंजी” अस ठेवलय. तिचा संसार पुन्हा उभारताना पाहून पुन्हा लढण्याची जिद्द निर्माण झालेल्या आईचा आनंद पाहून मला खूप बरं वाटलं.
अशा या लढावू आई साठी एवढच म्हणेन.     
“आली संकटे लाख ..”       
“नको थांबु तू बाई..”       
“देवांवर ही मात करशी..”       
“अशी आहे तू आई..”       
“अशी आहे तू आई..”

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
5 Comments
Inline Feedbacks
View all comments
Rakesh

Nice

Rakesh kalkutgi

Ek ch no

Datta Pore

Great , the story has a lot of vitality. While reading the story, it was eye- catching.

Rajiv Pujari

छान झालीय कथा!!