आहे पुन्हा फिरोनी
तुज तेथेच की जायचे,
मूर्खास मृत्यूचे ते
भय हे कशा कुणाचे? //धृ//

दारी जरी विषारी
आहे जरी विखारी,
उधळतो मी सर्वजागी
मज वैर ते कयाचे //१//

आकाश फाटले की
झाला निःशब्द वारा,
घर हे असे निरोगी
मज वाटते ती कारा,
सुटले हातामधूनी
आत्मे कुणाकुणाचे //२//

आहे जरा मरावे
आतून वाटताहे,
मरुनी स्वर्ग व्हावा,
हुरींनी मद्य व्हावे
रक्तात नाचतो तो
तव दुःख ना कुणाचे //३//

होतील एक सारे
होईल शांत सारे,
आले भले भले जे
देशास सार ठावे,
सत्यात पाहिले मी
सारथ्य भारताचे //४//

– ओमकार उपाध्ये – ०८ मे २०२० – १०.४९
#OmkarBalkrishnaUpadhye #AumkarUpadhye

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments