फिरुनी पुन्हा

फिरुनी पुन्हा पुन्हा इथे यावे,
आपण आपल्याला जोखावे
नारळ-काजी-पोफळी-कोकम
जास्वंदी-सदाफुली-गुलाब
सर्वांनी हट्ट पुरवावे!

व्हावी आपली आपल्यालाच पुन्हा ओळख,
नारायणा चरणी लिन व्हावे
दिसावा दुरूनच तो सिद्धाचा खडक
माऊलीच्या प्रेमात बुडून जावे..

ऐकाव्या गूढ गोष्टी पुन्हा साकवा वर,
करावी पहाटेची सैर शांत वावरात
दिसावी जळती मशाल दूर शिवारात
अनेक दडलेल्या कोड्यांना
सोडवायला पुढे धजावे..

मायेची माणसे अन छोटासा गाव,
टुमदार स्वप्नात जणू झुळझुळणारा बाव
खुलून जाईल पुन्हा एकदा खळातला मोहोर,

आपसूक जसे गालात हसू उमटावे..

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments