लोकल

आहे जरूरी थोडा मोकळा वेळ स्वतः साठी,
गडबड धावपळ विसरण्यासाठी…,
तसेही, तीच तीच लोकल पकडून,
आपण रोज जातो ना, आनंद मिळवण्यासाठी..

वेळ निघून जातो, कामे होत असतात
आपल्याला वाकुल्या दाखवून
लपाछपी जणू खेळत असतात,
त्यांना चकवून पाहू एकदा तरी,
मनापासून जिंकण्यासाठी,..
तसेही, तीच तीच लोकल पकडून,
आपण रोज जातो ना, आनंद मिळवण्यासाठी..

“करावे लागते”..”काय करणार?”
“लायबलिटी आहे म्हणून” वगैरे
सतत आपण ऐकत असतो,
“बरोबर आहे” म्हणून हो ला ठो देत असतो,
कुणी लिहून ठेवलय असच बोलायला हवं,
जरा वेगळे धुंडाळू, वेगळे बोलण्यासाठी..
तसेही, तीच तीच लोकल पकडून,
आपण रोज जातो ना, आनंद मिळवण्यासाठी..

निवांत क्षण, प्रेमळ सहवास
नितांत सुंदर संगीत अन मनोहर निसर्ग,..
सर्व आहे फक्त हवी आपली दृष्टी,
थोडा वेळ आणि लहान मुलाची क्युरॉसिटी,..
स्वतःला एकदा, स्वतःच्या नजरेतून पाहण्यासाठी…
तसेही, तीच तीच लोकल पकडून,
आपण रोज जातो ना, आनंद मिळवण्यासाठी..

3 thoughts on “लोकल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!