पैलतीर

डोळ्यामधला भाव तुझ्या तो अनोळखी का वाटे गं?
रंगवलेले चित्र आपले कृष्ण धवल का भासे गं?

काल अचानक स्वप्नामधले घर का दिसले नाही गं?
अन घरट्यातील दोन पाखरे बावरलेली दिसली गं

गाणी जी दोघांनी गायिली शब्द आठवत नाहीत गं
मोहवणारी धुंद बासरी निःशब्द आज का झाली गं?

पैलतीराचा मोह अनावर कधीच इतका नव्हता गं
रंग गंध अन शब्द न उरले तरीही तृप्त मी आहे गं 
©sandeepbapat

3 thoughts on “पैलतीर

 1. खूप सुंदर कविता आहे. आम्हाला आपल्या इतरही कविता वाचायला आवडतील..

  1. प्रिय समीर, प्रेम नावाची एक रचना पोस्ट केली आहे, जरूर वाचावी, धन्यवाद, संदीप

 2. प्रिय समीर,
  खूप धन्यवाद
  खरं सांगू का, माझ्या कवितेचे कौतुक करणारे तुम्ही पहिलेच
  छान वाटलं वाचून.
  हो मी माझ्या अजून कविता पोस्ट करतो, आपण जरूर वाचा, आणि आपला अभिप्राय कळवा

  आपला, संदीप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!