आमचं काय तसं नसतंय

आमचं काय तसं नसतंय
आम्हाला काय पण चालतंय
गरमागरम पोळीवरती
तूप चमचाभर लागतंय

आमचं काय तसं नसतंय
आम्हाला काय पण चालतंय
काम लोकांनी करायचं
पण शिस्तीत व्हायला लागतंय

आमचं काय तसं नसतंय
आम्हाला काय पण चालतंय
दुपारी नाही झोपलं तर
डोकं दुखायला लागतंय

आमचं काय तसं नसतंय
आम्हाला काय पण चालतंय
उपासाला सतरा प्रकारचं
खाणं मात्र लागतंय

आमचं काय तसं नसतंय
आम्हाला काय पण चालतंय
बस समोरनं गेली तरी
रिक्षानंच जायचं असतंय

आमचं काय तसं नसतंय
आम्हाला काय पण चालतंय
मोडून पडलं तरी
बिलकुल वाकायचं नसतंय

3 thoughts on “आमचं काय तसं नसतंय

  1. सुंदर.. पुणेकरांवर लिहिली आहे का कविता ?? ? छान..

    1. होय बरोबर ओळखलंत, खूप जणांनी कविता वाचल्या वाचल्या हाच प्रश्न केला, खरंच पुणेकर आणि त्यांच्या सवयी, कायमच लिखाणाचा विषय राहिल्या आहेत. धन्यवाद – संदीप

  2. व्वा मस्त आहे कविता.. पुणेकरांचे अचूक वर्णन केले आहे आपण.. सुरेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!