वेश्या – भाग १

मीरा!!! उंच टाचांची सँडल, चकचकीत चंदेरी साडी बेंबीच्या खाली घट्ट आवळलेली.. जितका साडीचा चा रंग गडद तेवढाच गडद मेकअप.ओठांवर गडद चॉकलेटी रंगाची लिपस्टिक लावलेली आणि कुठल्यातरी चीप परफ्यूम चा वास संध्याकाळच्या वेळी कॉर्पोरेशनच्या बस स्टॉप वर घुमत होता. येणाऱ्या जाणान्यांच्या नजरा तिच्यावर घोंगावत होत्या अगदी बेमालूमपणे. काही तिरस्काराच्या तर काही वासनेच्या. पण तिला या नजरांची सवय झाली होती, तिला आता हे रोजचंच झालं होत. ती तिच्या फोन मध्ये नंबर चाळत होती.

कोणाला फोन करावा आणि कशासाठी? आपल अस बोलण्यासाठी ती कुणाला फोन करतच नव्हती. एवढ्या काही दिवसात भेटलेले कस्टमर तिला आपला नंबर देऊन ठेवायचे पण ते तिला, त्यांना जेव्हा गरज वाटेल तेव्हाच भेटायचे. या सगळ्यातून कसं पुढे जायचं हे तिला आता चांगलाच कळलं होत. नंबर चाळता चाळता तीच लक्ष रस्त्याच्या पलीकडच्या एका जोडप्याकडे गेल. तो मुलगा तिला लाडाने आईस क्रीम खाऊ घालत होता आणि त्यांचे असेच काहीतरी चाळे चालले होते. मनातल्या मनातच तिने एक घाणेरडी शिवी हासडली. तिच्यासाठी प्रेम ही आता एक घाणेरडीच संकल्पना होती.

सोळाव्या वर्षाचं कोवळ वय असतानाच अशोक तिला भेटला. अशोक च सगळ्या गावात नाव. शहरात गेलाय स्वतःचा व्यवसाय करतो अशी गावातल्या लोक्कांची समजूत आणि त्यावर तीपण भाळली होती. तिच्या शेजारच्या आळीत राहायचा तो. अधून मधून सणावाराला गावाला येई. मीरा तेव्हा दहावीला होती. शाळेत जाताना एकदा त्याची न तिची नजरानजर झाली. तस ती त्याच्याबद्दल ऐकून होती पण आज पाहिलं होत, त्यानेपण तिची नजर हेरली होती. दुसऱ्याच दिवशी त्याने हिम्मत करून सरळ लग्नाची मागणी घातली. मीरा ला घरच्यांची भीती वाटत होती. त्यांना हे सगळं सांगणं म्हणजे खूपच मोट्ठी गोष्ट होती तिच्यासाठी. शेवटी कुणालाही ना सांगता पळून जायचं ठरलं. असाही त्यांच्या प्रकरणाबद्दल गावात कुणाला जराही खबर नव्हती. १५ दिवसात मीराने घरच्यांना वाऱ्यावर सोडून आपलं नवीन जीवन सुरू करायचा बिर्नय घेतला. घरचे म्हणजे कोण? एक बापच तर होता फक्त! दारुडा!! जन्मदाती आई बापाच्या दारूडेपणाला कंटाळून घरातून पळून गेली होती. आणि नंतर तिचा काहीच पत्ता लागला नाही आणि त्याची दूषणे मात्र मीराला पावलोपावली ऐकून घ्यावी लागत होती, स्वतःच्या बापाकडून. कदाचित त्यामुळंच तिची माया लागत नव्हती बापावर देखील. दारूच्या नशेत बाप पोरीला विकायची भाषा करायचा हे पण तिने अगदी कळत असल्यापासून सहन केलं होत. या सगळ्यांमुळंच तिने नवीन आयुष्यची सुरुवात करावी म्हणून तसा निर्णय घेतला असावा. नवीन स्वप्न उराशी घेऊन मीरा अशोक सोबत शेवटच्या एसटीत बसली. गर्द काळोख, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा पिवळट प्रकाश आणि सोबत अशोक. पुण्याला पोहचायला अजून 3 तास बाकी होते. मंद प्रकाशामुळे आधीच तिचे डोळे जड झाले होते. उद्याच काय?? हा प्रश्न मनात ठाण मांडून बसला होता त्याच विचारात ती अशोकच्या खांद्यावर डोकं ठेऊन शांत झोपी गेली.

सकाळी तिला जाग आली तेव्हा कानावर अजाण चे स्वर ऐकू येत होते. एका दहा बाय दहाच्या खोलीत ती एकटीच पडली होती. डोकं जड झालं होत, तोंड कोरडं पडलं होत…

मीरा सकाळी उठली तेव्हा एक दहा बाय दहा च्या रूम मध्ये होती…बाहेरून अजाण चा स्वर तिच्या कानावर पडत होता.

डोकं जड झालं होत, तोंडाला कोरड पडली होती. आजिबात हालताही येत नव्हतं तिला तरीपण अंगात त्राण आणून ती उठली..दिवस नुकताच उगवत होता. अशोक कुठेही दिसत नव्हता म्हणून ती थोडी घाबरली. स्वतःला एकटीला पाहून मग स्वतःनेच स्वतःला सावरल आणि चारही बाजूचा अंदाज घेतला. भिंतीवर एक तोकडे कपडे घातलेल्या बाईचं मोठ्ठ पोस्टर होत, ते पाहून तिला किळस तर आलीच पण एकूणच ती जागा चांगली नाही हे तिला कळून चुकलं. नेमकं काय झालं हे आठवायला तिने जरा जोर दिला पण तो येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा अंधुकसा पिवळट प्रकाश, गडद अंधार आणि अशोक च्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपलेला क्षण यापलीकडे तीची स्मरणशक्ती तिला साथ देत नव्हती. तिच्या डाव्या हाताला एक खिडकी होती, त्यातून सकाळचा मंद तांबडा प्रकाश येत होता. दिवस अजून पूर्ण उजाडायचा होता. तिने खिडकीतून बाहेर पाहिले, काही माणसं दुधाच्या घागरी सायकल ला बांधून घेऊन जात होते, समोरच चहाची टपरी होती – चहावाल्याने पहिला चहा बनवला होता त्याने एक कप चहा आणि एक ग्लास पाणी घेतले आणि बरकत म्हणून रस्त्यावर ओतले..पाणी पाहून तिला पुन्हा तहानेची जाणीव झाली. इकडं तिकडं पाहिलं तर बेड च्या शेजारी ठेवलेल्या एक छोट्या टेबलवर भरलेली पाण्याची बाटली होती अधाशीपणे तिने ती बाटली संपवली. अन दरवाज्याकडे वळली. दरवाजा बाहेरून बंद होता. तिने दारावर जोरात थाप मारली, आवाज दिले पण कुणीही दरवाजा उघडला नाही. खिडकीजवळ आली पण बाहेर चहावालाच दिसत होता. तिला वाटलं की जोरात ओरडावं पण काहीतरी विचार करून गप्प राहिली. भीती हळूहळू वाढत होती आणि मनात प्रश्नच थैमान – मी इथे आले कशी?, अशोक कुठेय? अशोक ने तर मला इथे आणले नसेल? अशोक ने मला इथे का आणले असेल? नाही…अशोक तसा मुलगा नव्हता.. तो असा करणार नाही पण पैशांसाठी माणूस कोणत्याही ठरला जाऊ शकतो.. पैशांसाठी स्वतःच्या बायकोला विकलेलं तिने सिनेमांमध्ये पाहिलं होत. पण माझा अशोक? पण मग तसं होत तर काल रात्रीच मला आठवत का नाहीये? अशा हजारो लाखो प्रश्नांनी मनात काहूर माजवलं होत पण तिला काय करावं हेच समजत नव्हतं. तिला रडू येत होत पण सैतान बापाच्या हाताखाली दिवस काढल्यामुळे तिने रडू आवरलं आणि सामना करायचं ठरवलं. खिडकी बाहेर पाहिलं आणि आजूबाजूच्या परिसराचा अंदाज घेतला. दरवाज्याकडं वळली आणि दार जोरात ठोठावू लागली. दोन तीन वेळा दार जोरात ठोठावल्यावर बाहेरून काहीतरी हालचाल झाल्यागत वाटली. ती आवाजाचा कानोसा घेऊ लागली. कुलूप उघडल्याचा आवाज, दार उघडले आणि समोर एक चाळिशीतली बाई.. केस अस्ताव्यस्त, डोळे थोडे मोढे, त्यांना शोभेल अशी कपाळावर टिकली. नुकतीच झोपेतून उठली असून सुद्धा ती जातिवंत सुंदर दिसत होती. ओठ पण खाऊन लाल झाले होते डोळे थोडे मलूल झाले होते झोपेमुळे. मोकळा सोडलेला पदर अस्ताव्यस्त पसरला होता. साडी फार भरजरी नसली तरी सकाळच्या वातावरणाला शोभणारी नव्हती. ती समोर येताच एक उग्र वास मिराच्या नाकात घुमला. तिला पाहून मीराला एकूणच ती कोण असेल याचा अंदाज आलाच होता. ती बाई तिरसट आवाजात वैतागून बोलली, का सकाळी सकाळी झोपेची वाट लावतीये, कालच आलीएस ना तू? वाट बघ थोडी नंतर बोलू. मीरा एवढ्या शांतीत ऐकणारी नव्हती. तिने त्या बाईला हिसका दिला आणि पळायचा प्रयत्न केला तेवढ्याच चपळाईने त्या बाईने त्याच्या दंडाला आवळून तिला जोरात मागे खेचलं आणि रूम मध्ये ढकललं, मीरा टेबलापाशी जाऊन जोरात पडली. ती बाई भलतीच रागावली होती. तिच्या रागामुळे तिच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अजूनच भडक दिसू लागल्या होत्या. तिच्या नजरेत एक वेगळेच करारीपण दिसत होत. मी जोपर्यंत काही सांगत नाही तोपर्यंत हलायचेदेखील नाही. प्रेमाने सांगतेय, ऐकलं नाहीस तर जबरदस्ती पण करता येते मला! तुझ्यासारख्या हजार पोरीना वठणीवर आणलाय मी. मीरा धुमसून रडत होती, तिचा आक्रोश सकाळची शांतता भंग करत होता. तिने परत आवेशात, रंगात येऊन बाहेर पळायचा प्रयत्न केला पण व्यर्थ. यावेळी त्या बाईने खूप जोरात पकडलं आणि आधीपेक्षा अजून जोरात ढकललं. मीराला ला कळून चुकलं की विरोध

कारण व्यर्थ आहे. त्या बाईच्या बोलण्यातला राग अजूनच चढला, मीरा रडत रडत काही बाही बोलायचा प्रयत्न करत होती …अशोक, मी इथे कशी आले वगैरे वगैरे पण त्या बाईने तिचे ऐकून घेतले नाही. मी परत येईपर्यंत गपचूप पडून राहायचं नाहीतर जीवे मारायला कमी नाही करणार मी, समजलं? एवढे बोलून तिने दरवाजा जोरात आपटला आणि कुलूप लावून निघून गेली.

मीरा काकुळतीला येऊन रडत होती. तिला स्वतःचीच चीड येऊ लागली. घरातून पळायच्या निर्णयावर ती स्वतःला कोसू लागली आणि अजून जोरात रडू लागली. अशोक कोण होता? तो कुठे गेला? त्या रात्री नेमके काय झाले हे प्रश्न मात्र तिच्यासाठी अजूनही अनुत्तरीतच होते.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments