न्यूझीलंड मधील आपल्या काही मराठी जणांनी एकत्र येऊन “न्यूझीलंड मराठी मित्रमंडळाची” कल्पना प्रत्यक्षात आणली. या माध्यमातून आपण मराठी -साहित्य, कला, संगीत आणि एकूणच “महाराष्ट्र संस्कृती” शी निगडित असणाऱ्या गोष्टी, नवे उपक्रम आपल्या पर्यंत पोहोचवायला उत्सुक आहोत.आमच्या या यू ट्यूब चॅनल ची मुहूर्तमेढ आम्ही खास महाराष्ट्र दिना निमित्त करत आहोत आणि सविनय सादर करत आहोत – “महाराष्ट्र गीत ” – या व्हिडीओ मधील गायक – राजश्री निगुडकर, मानसी शिंगरे, अर्चना नेवासकर, सुप्रिया सातव, सारंग यंदे, सुदीप खेडगीकर, ओंकार उपाध्ये
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ?
#MaharashtraGeet #JayJayMaharashtra #NZMM2020 #NewZealandMarathi
अफलातून.. खूप छान उपक्रम आहे. असेच उपक्रम या पुढेही चालू ठेवण्यासाठी शुभेच्छा..