महाराष्ट्र दिन

आज आपल्या सोशल मिडिया वर महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने अनेक मेसेजेस आले असतील, आपण ते मेसेज वाचून पुढे फोरवर्डही करत असाल, पण आपल्या राज्याच्या इतिहासाबद्दल आपल्याला किती माहीत आहे, हे आपण आज थोडक्यात जाणून घेऊ.

महाराष्ट्राचा विचार केल्यावर आपल्याला सर्वात आधी आठवतात महाराष्ट्राचे दैवत, छत्रपती शिवाजी महाराज. पण मंडळी, महाराष्ट्राचा इतिहास हा फार जुना आहे. महाराष्ट्रातील विविध स्थळांचा रामायणमहाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो.

साधारण आजपासून ३,५०० वर्षा पूर्वी महाराष्ट्रात ताम्रपाषाण संस्कृती नांदत होती, ह्या संस्कृतीचे अवशेष आपल्याला आजही इनामगाव (दौंड जवळ) येथे बघावयास मिळतात. येथे झालेल्या उत्खाननामध्ये अभ्यासकांना पूर्वीच्या कालच्या मानवाचे अवशेष मिळाले आहेत. अश्या प्रकारची बरीच स्थळे महाराष्ट्रात आजही आहेत.

नंतरच्या काळात महाराष्ट्रामध्ये मौर्य साम्राज्याची अधिसत्ता होती. त्यानंतर सातवाहन साम्राज्याचा उदय झाला. या सातवाहन साम्राज्याची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच आजचे पैठण ही होती. सातवाहन राजांनी महाराष्ट्रावर सुमारे ३०० ते ४०० वर्ष राज्य केलं. याच काळात महाराष्ट्रभर बौद्ध लेण्या खोदण्यात आल्या. तुम्ही भाजे लेणी, कार्ले लेणी, नाणेघाटातील लेणी, जुन्नर परिसरातील लेण्यान्बद्दल ऐकलं असेलच, कदाचित तुम्ही या लेण्यांना भेटही दिली असेल, या सर्व लेण्या सातवाहनकालीन आहेत, म्हणजेच आजपासून सुमारे २,००० वर्ष जुन्या आहेत. सातवाहनांची सत्ता गेल्यानंतर चालुक्य, राष्ट्रकुट, वाकाटक यांची सत्ता महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी होती. याच राजवटींनी अजिंठा, वेरूळ सारख्या लेण्यांची निर्मिती केली. भारतातील १२०० लेण्यांपैकी ११०० लेण्या ह्या महाराष्ट्रात आहेत. नंतर बाहेरून आलेल्या लोकांनी महाराष्ट्रावर हल्ले करून इथल्या मंदिरांची, लेण्यांची अपरिमित हानी केली.

महाराष्ट्राचा मध्ययुगीन इतिहास सर्वांनाच माहिती आहे. या काळातील इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे सोनेरी अक्षरात लिहिला गेला. शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीमध्ये मराठ्यांकडे महाराष्ट्रातील ३५० किल्ले होते. महाराजां नंतर स्वराज्याला साज चढवला तो पेशव्यांनी. पेशव्यांची राजधानी, पुण्यनगरी म्हणजेच आजचे पुणे ही होती. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. याच पुण्यात पेशव्यांनी भव्य असा सात मजली शनिवारवाडा बांधला. आज या शनिवारवाड्याचे काहीच भाग सुरक्षित आहेत, पण असे असले तरी हा शनिवारवाडा आजही जगभरातल्या पर्यटकांना खुणावतोय आणि आपल्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतोय.

आपल्या या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत रामदास स्वामी अश्या अनेक साधू संतांनी, तर लोकमान्य टिळक, सावरकर, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, बाबा आमटे, यांच्यासारख्या थोर सत्पुरुषांनी जन्म घेतला.

 १५ ऑगस्ट १९४७  रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, भाषावार प्रांत विभागणीची सुरुवात झाली. मुंबई ही मराठी बहुभाषीकांची असूनही, केंद्र सरकारने मुंबईला महाराष्ट्रात स्थान देण्यास नकार दिला. तेव्हा महाराष्ट्रातील जनतेने या निर्णयाला प्रखर विरोध केला व आंदोलन करायला सुरुवात केली. या आंदोलनात १०५ लोक हुतात्मा झाले. आचार्य अत्रेशाहीर साबळेसेनापती बापट, इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली. अखेर १ मे, १९६० साली  महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकणमराठवाडापश्चिम महाराष्ट्रदक्षिण महाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रविदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली.  संयुक्त महाराष्ट्र चळवळीने  महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.

अश्या ह्या आपल्या महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात.

खरं तर महाराष्ट्र राज्याबद्दल लिहिण्यासारखे बरेच काही आहे. पण सगळेच मुद्दे मी इथे लिहू शकत नाही. हा लेख फक्त आपल्याला, आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची तोंड ओळख व्हावी म्हणून आहे. त्यामुळे हे राज्य निर्माण करण्यासाठी ज्या ज्या वीरांनी, समाजसेवकांनी मोलाचे योगदान दिले, त्यांना वंदन करून मी इथेच थांबतो.

धन्यवाद. जय महाराष्ट्र……..!

महाराष्ट्रातील प्रमुख सण:-                

गुढी पाडवा

गणेशोत्सव

नवरात्री

दिवाळी

होळी.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरे

मुंबई (राजधानी):-

नागपूर (उप राजधानी):-

पुणे (सांस्कृतिक राजधानी)

नाशिक

औरंगाबाद

कोल्हापूर

सातारा

सोलापूर

महाराष्ट्रातील ७ आश्चर्य

  • ग्लोबल पगोडा.
  • सीएसटी स्टेशन.
  • दौलताबाद चा किल्ला.
  • कास पठार.
  • रायगड.
  • लोणार.
  • अजिंठा लेणी.

महाराष्ट्रात ल्या काही गमतीदार गोष्टी.

  • महाराष्ट्रात सर्वात मोठ्या लांबीच्या रस्त्यांचे चे जाळे आहे आहे. (२,६७,५०० किमी).
  • अग्निजन्य खडकातनिर्माण झालेल्या खाऱ्या पाण्याचे जगातील एकमेव विवर म्हणजे लोणार होय.
  • शनी शिंगणापूर या गावात कुठल्याही घराला दरवाजे नाहीत. शनी देव गावातील सर्व मालमत्तेचे रक्षण करतात असे मानले जाते.
  • नवापूर रेल्वे स्टेशन हे दोन राज्यात विभागले गेले आहे, या स्टेशन चा अर्धा भाग महाराष्ट्रात तर अर्धा गुजरात मध्ये आहे.
  • औरंगाबाद ला सिटी ऑफ गेट्स म्हणतात. मध्ययुगीन कालखंडात या शहराला ५२ दरवाजे होते, ज्यातील आत्ता फक्त १३ अस्तित्वात आहेत.
  • आपल्या देशातील सर्व सोन्याच्या संबंधित मालमत्ता नागपूर मधील रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये ठेवले जाते.
  • आशियातील सर्वात पहिली ट्रेन ही १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली.
  • भारतातल्या ३६ जागतिक वारसा स्थळांपैकी ४ वारसा स्थळे ही महाराष्ट्रात आहेत.
  • भारतातले पहिले पुस्तकांचे गाव म्हणून भिलार या गावाला ओळख मिळाली आहे.
  • महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणजे साल्हेर किल्ला होय.
  • सर्वात उंच शिखर – कळसूबाई.
  •  नाशिक मध्ये भारतातील कागदी चलनाची छपाई होते.

शेअर करा..

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments