आमच्याबद्दल थोडक्यात

पुण्यामध्ये चार वैचारिक डोकी सारखी एकत्र यायची. अगदी चहाच्या टपरीवर असो किंव्हा एखाद्या हॉटेलमध्ये, अनेक विषयांवर चर्चा व्हायची, बऱ्याचदा एकमत व्हायचे, बऱ्याचदा मतभेद ही व्हायचे.. मग पुलंच्या कथाकथनातील एखादा किस्सा आठवला जायचा आणि वातावरण निवळायचं. बऱ्याचदा भर पावसात गरम गरम चहा पिताना कोणालातरी पटकन पाडगावकरांची एखादी कविता आठवायची चौघेही तालासुरात ती कविता म्हणायचे. त्यांच असं भेटणं चालू होतं, सगळे एकमेकांचे चांगले मित्र होत होते कारण सर्वांच्या मध्ये एक समान धागा होता तो म्हणजे “साहित्य“. एकमेकांना आपल्या कविता, आपण लिहिलेले लेख ऐकवता यावेत आणि त्यावर भरभरून दाद मिळावी इतकीच काय ती अपेक्षा.

मग एके दिवशी सहज यांना एक कल्पना सुचली आपली ही साहित्यिक मैत्री जगभर न्हेली तर? आपल्या कवितांना, लेखांना नवनवीन रसिक वाचक यांची दाद मिळेलच पण जगभरातील सर्व मराठी लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळेल आणि वाचकांना सुद्धा असंख्य साहित्याचा सागर उपलब्ध होईल. इथूनच सुरू झाला मराठीसाहित्य.कॉम चा प्रवास. हा प्रवास सुरू आमच्यापासून झाला मात्र, महाराष्ट्रातील प्रत्येक साहित्यिकाला आणि त्या साहित्याला भरभरून दाद देणाऱ्या त्याच्या वाचकालाही हा प्रवास आपला वाटू लागला.

अखेरीस मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या आपणा सर्वांनाच नमस्कार.

लिहित रहा, वाचत रहा. कारण आता, मराठीसाहित्य.कॉम सोबत अवघे धरू ”साहित्यपंथ”!!