टाकळी, ढोकेश्वर

# पु़ण्यापासुनचे अंतर~ १२० किमी

# जाण्याचा मार्ग~ पुणे अहमदनगर मार्गे पद्मश्री श्री. आण्णा हजारे यांच्या राळेगण सिध्दी गावी जाण्यासाठी पारनेर फाटा आहे तिथुन आतमध्ये प्रवेश केल्यानंतर साधारणपणे ३६ किमी वर टाकळी ढोकेश्वर गाव आहे

# आजुबाजुची पर्यटनस्थळे~
१) पळशीचा भुईकोट
२) पळशीचा वाडा
३) जामगावचा भुईकोट

# लेणीची मााहिती~
लेणीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपल्या तिथे बाहेरील बाजूस गंगा व यमुना या देवींचे शिल्प आढळते. त्या शिल्पा मध्ये गंगा देवीच्या पायथ्याशी सुसर कोरलेली आहे. तर यमुना देवीच्या पायथ्याशी ऐक मगर बाळ गिळत असल्याचे शिल्प कोरलेले आहे. आतमध्ये प्रवेश करताच समोरील बाजुस कमानीच्या ठिकाणी गजलक्ष्मी आणि त्यांच्या बाजुला हत्ती कोरलेले आहेत. लेण्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजुला गणपती आणि अष्टदेवता त्यांच्या वाहणांसोबत कोरलेल्या आहेत. तिथुन पुढे गेल्यानंतर ऐक लोखंडी जाळी बसवलेली आहे ज्यामध्ये जवळपास ७५ विरघळत आहेत ज्यामध्ये देवतांच्या मुर्ती सुध्दा आहेत. त्या सर्व विरघळ या महादेवांच्या सैनिकांच्या असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. ही लेणी संपूर्ण एकाच डोंगरामध्ये कोरलेली आहे. जिथे महादेवाला संपुर्ण प्रदक्षिणा घालता येते. तसेच इथे आणखी ऐक महादेवाचे शिव तांडव नृत्य करतानाचे देखील शिल्प कोरलेले आहे. लेणीच्या बाहेरील बाजूस ऐक मोठा पाण्याचा टाका आहे ज्यांच्या बरच्या बाजुची कोरीव बांधणी ही त्या डोंगरावरील सर्व पाणी याच टाक्या मध्ये नैसर्गिकरित्या कसे जमा करता येईल याची दूरदृष्टी दिसुन येते.

# दंतकथा~
टाकळी ढोकेश्वर हे महादेवाचे मंदिर आहे. हे पांडवांच्या अगोदरचे मंदिर आहे. पांडव ज्यावेळी अज्ञातवासामध्ये होते त्यावेळी ते याच मार्गाने पुढे नाशिकला गेले. त्यावेळी त्यांनी याच भागातील विश्रांतीसाठी आजुबाजूचे ४/५ डोंगर पाहिल्यानंतर त्यांना तिथे श्री लक्ष्मी देवीची वापरायची भांडी सापडली ज्यामध्ये कडई , भाता यांचा समावेश होता. त्यानंतर पांडवांना याच डोंगरावर लेण्या दिसल्या जिथे त्यांना प्रत्यक्षात महादेवांनी दर्शन दिले.
इथे ऐक प्रचंड मोठा नंदी आहे. ज्याची ऐक अख्यायिका अशी आहे कि तो नंदी व्दापर युगापासुन सोन्याच्या मोहरा देत असे ज्यांचा वापर समाजातील कार्यासाठी होत असे नंतर, ऐका स्रीला त्या सोन्याच्या मोह झाला व त्या तिने पळवून नेण्याचा प्रयत्न केला परंतु ती त्या गावच्या पेशीबाहेर सुध्दा घेऊन जावु शकली नाही. व तिथेच तिची शिळा बनली. व त्या मोहरांचे रूपांतर गारामध्ये झाले. आज देखील त्या नंदीच्या गुदद्वारात (मागील बाजूस) त्या मोहरा स्पष्टपणे दिसत आहेत.

# जेवणाची सोय~ टाकळी मध्ये जेवणासाठी बरीच हॉटेल्स उपलब्ध आहेत.

# प्रवासखर्च~ मी अपाचे २०० गाडीने गेलो होतो जिच्यामध्ये मला ६००/- पेट्रोल खर्च आला आहे.

For more details please contact – [email protected]
Facebook- facebook.com/sudarshan.bairagi.12

शेअर करा..

guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments